शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

फेसबुक फ्रेंड बनून महिलेला सव्वातीन लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 01:49 IST

परदेशातून निधी पाठविण्याचा केला बहाणा

लोणी काळभोर : एका विधवा महिलेला फेसबुकवर मित्र बनवून तिला भेटवस्तू पाठविल्याचा बहाणा करून तिच्याकडून तब्बल सव्वा तीन लाख रुपये लुबाडल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : रुक्मिणी प्रकाश देवकाते (वय ३०, रा. आश्रमरोड, उरुळी कांचन, ता. हवेली) यांच्या पतीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्या आईवडील, भाऊ व मुलगा यांच्यासह राहतात आणि उदरनिर्वाहासाठी इंदापूर येथील एका रुग्णालयात नोकरी करतात. आॅक्टोबर २०१८ मध्ये त्यांना फेसबुकवर बॉबी डोनटास या नावाने एक फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. ती स्वीकारल्यानंतर त्या व्यक्तीने त्याचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर देवकाते यांना दिला. त्यानंतर दोघांची व्हॉट्सअ‍ॅपवर चर्चा सुरू झाली. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी त्या व्यक्तीने देवकाते यांना पर्स, मोबाईल, सोन्याची चेन व २५ हजार पौंड भेट म्हणून कुरिअरद्वारे पाठवले आहेत, ते स्वीकार असे सांगितले.२६ नोव्हेंबर रोजी कुरियर आॅफिसमधून बोलत आहे असे सांगणाऱ्या लायटन पुई नावाच्या महिलेने कुरियर आल्याचे सांगितले. ते कुरियर मिळण्यासाठी पंधरा हजार रुपये भरण्यास सांगितले. देवकाते यांनी मित्राशी चर्चा करून ते पैसे भरले. परत त्याच महिलेने कुरियरमधील पैशामुळे ४५ हजार रुपये भरण्यास सांगितले. देवकाते यांनी मित्राशी चर्चा करून तेही पैसे भरले. त्यानंतर परत एकदा त्या महिलेने २५ हजार पौंड भारतीय चलनात रुपांतर करण्यासाठी ९५ हजार रुपये भरण्यास सांगितले. देवकाते यांनी फेसबुक मित्राशी चर्चा करून तेही पैसेही भरले. परत त्या महिलेचा फोन आला की कुरियरचा टॅक्स भरण्यासाठी एक लाख ६८ हजार रुपये भरायला सांगितले. देवकाते यांनी मित्राशी चर्चा करून हे पैसेही भरले. नंतर परत एकदा त्या महिलेने सव्वा दोन लाख रुपये भरण्यासाठी देवकाते यांना फोन केला होता. त्या वेळी देवकाते यांनी सांगितले की, आता माझ्याजवळ पैसे नाहीत. आतापर्यंत ३ लाख २३ हजार रुपये भरले आहेत. परत तुम्ही सव्वा दोन लाख रुपये भरायला सांगत आहात. मला पार्सल नको, माझे पैसे माघारी द्या. या वेळीही देवकाते यांनी मित्राशी चर्चा केली. या वेळी त्याने २५ हजार रुपये भरण्यास सांगितले. परंतु, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी हे पैसे भरले नाहीत आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यात संपर्क साधून सदर दोन व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.फेसबुकवर अनेकवेळा अनोळखी लोकांकडून फ्रेंड रिक्वेस्ट येते. ती आपण स्वीकारल्यामुळे त्या अनोळखी व्यक्तीला आपली कौटुंबिक माहिती रोज अपडेट स्वरूपात कळत असते. आपण कधी गावाला जाणार परत कधी येणार, कुठे जाणार याची इत्थंभूत माहिती फेसबुक पोस्टवरून त्या व्यक्तीला मिळते. त्यामुळे अनोळखी व्यक्तीला फेसबुक फ्रेंड बनविण्याचे टाळा, असे आवाहन पोलिसांनी केली.

टॅग्स :Facebookफेसबुकfraudधोकेबाजी