ऑनलाइन कुत्र्याचे पिल्लू खरेदीच्या बहाण्याने महिलेला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:08 IST2021-07-22T04:08:05+5:302021-07-22T04:08:05+5:30

पुणे : कुत्र्याच्या पिल्लाच्या विक्रीची जाहिरात फेसबुकवर करून ऑनलाइन पैसे घेतल्यानंतर पिल्लू न देता महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर ...

Woman ganged up under the pretext of buying a puppy online | ऑनलाइन कुत्र्याचे पिल्लू खरेदीच्या बहाण्याने महिलेला गंडा

ऑनलाइन कुत्र्याचे पिल्लू खरेदीच्या बहाण्याने महिलेला गंडा

पुणे : कुत्र्याच्या पिल्लाच्या विक्रीची जाहिरात फेसबुकवर करून ऑनलाइन पैसे घेतल्यानंतर पिल्लू न देता महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी अनिकेत अनिल देशमुख (वय २५, रा. धानोरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी धानोरीतील एक ३४ वर्षांच्या महिलेने विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

अनिकेत देशमुख याने आपल्या फेसबुकवर कुत्र्याच्या पिल्लाचे फोटो विक्रीसाठी अपलोड केले होते. फिर्यादीने त्याच्याकडून रिट्रीव्हर जातीचे कुत्र्याचे पिल्लू विकत घेण्यासाठी त्याच्या ‘गुगल पे अकाऊंट’वर ९ हजार रुपये पाठविले. त्यानंतर त्यांनी अनेक दिवस कुत्र्याच्या पिल्लू मिळण्याची वाट पाहिली. परंतु, देशमुखने पिल्लू आणून दिले नाही. त्यांनी चौकशी केल्यावर त्या पिल्लाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी ऑनलाईन घेतलेले पैसे परत केले नाही. शेवटी त्यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक झेंडे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Woman ganged up under the pretext of buying a puppy online