शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
2
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
3
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
4
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
5
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
6
सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?
7
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
8
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
9
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
10
जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल
11
आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान
12
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 
13
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
14
"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी
15
OYO ला आर्थिक वर्ष २४ मध्ये १०० कोटींचा निव्वळ नफा; पहिल्यांदाच नफ्यात आली कंपनी
16
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
17
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
18
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
19
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
20
TATA चा 'हा' शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "१३५ पर्यंत येणार..."

विवाहित महिला डॉक्टरचे नग्न व्हिडीओ आणि फोटो केले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2021 4:01 PM

पिंपरी : डाॅक्टर महिलेला लग्नाचे अमिष दाखवून व्हिडिओ कॉलवर बोलण्यास भाग पाडले. त्यांना कपडे काढण्यास सांगून नग्न व्हिडिओ स्क्रिन रेकॉर्ड करून ते ...

पिंपरी: डाॅक्टर महिलेला लग्नाचे अमिष दाखवून व्हिडिओ कॉलवर बोलण्यास भाग पाडले. त्यांना कपडे काढण्यास सांगून नग्न व्हिडिओ स्क्रिन रेकॉर्ड करून ते व्हायरल केले. पिंपरी-चिंचवड शहरात २ मार्च २०२० ते ८ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत हा धक्कादायक प्रकार घडला. 

याप्रकरणी प्रणव अरविंद पांचाळ (रा. अटलादरा, जि. वडोदरा, गुजरात) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबद्दल ३६ वर्षीय पीडित महिलेने शुक्रवारी (दि. ८) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही विवाहित असून, डाॅक्टर आहे. प्रणव पांचाळ याने फिर्यादी महिलेशी लग्न करण्याचा बहाणा केला. त्याच्या मोबाइलवरून फिर्यादीला व्हॉट्सअप व्हिडीओ कॉलवरून बोलण्यास भाग पाडून त्यांना कपडे काढण्यास सांगितले. त्यानंतर नग्न व्हिडिओ स्क्रिन रेकॉर्ड केले व त्यांचे नग्न फोटो फिर्यादीच्या मेलआयडीवर व्हायरल केले.

तसेच फिर्यादीच्या पतीच्या मोबाइलवर हा व्हिडीओ पाठविला. तसेच त्याचा व्हिडिओ कॉल रिसिव्ह करण्यासाठी फिर्यादीशी मोबाइलवर वारंवार संपर्क केला. फिर्यादीच्या नातेवाइकांना फोटो व्हायरल करण्याच्या धमकी दिली. फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य व बदनामी करून फिर्यादीचा विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, फिर्यादी डाॅक्टर महिलेचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले असून, २ मार्च २०२० ते ८ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpri-acपिंपरीPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी