अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:09 IST2021-05-27T04:09:30+5:302021-05-27T04:09:30+5:30

पुणे : अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकीवरून पडून एका महिलेचा मृत्यू झाला. मंगल शंकर मदने (वय ५९, रा. त्रिमूर्ती ...

Woman dies after falling off two-wheeler | अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू

अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू

पुणे : अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकीवरून पडून एका महिलेचा मृत्यू झाला. मंगल शंकर मदने (वय ५९, रा. त्रिमूर्ती कॉलनी, पिंपळे गुरव) असे या महिलेचे नाव आहे. ही घटना पुणे-मुंबई रोडवरील खडकी रेल्वे स्टेशनपुढे रेल्वे रुळाजवळ मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.

बाळू रामचंद्र करडे (वय ५६, रा. प्रेमरथ हाईट्स, आनंदनगर, जुनी सांगवी) यांच्या दुचाकीवर बसून मंगल मदने चालल्या होत्या. खडकी रेल्वे स्टेशनपुढे बोपोडी येथील रेल्वे रुळाजवळ करडे यांनी अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे मंगल मदने या दुचाकीवरून खाली पडल्याने बेशुद्ध झाल्या. त्यांना रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस नाईक प्रदीप न्यायनीत यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली असून बाळू करडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Woman dies after falling off two-wheeler