धनकवडी : कपडे वाळत घालत असताना एका महिलेचा आठव्या मजल्यावरच्या गॅलरीतून पडून मृत्यू झाल्याची घटना जांभूळवाडी येथे मंगळवारी सकाळी घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पित्रादेवी हरिजी सिंग (वय ५६ वर्षे, रा. लेकवृड सोसायटी, जांभूळवाडी) असं महिलेचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आंबेगाव खुर्द भागा तील लेकवुड या सोसायटीत पित्रादेवी तीच्या सुनेसह आठव्या मजल्यावर राहतात. त्यांच्या पतीवर मुंबईत उपचार सुरु असल्यानं मुलगाही मुंबईतच असतो. त्या सकाळी साडेसातच्या सुमारास गॅलरीत स्टुलवर उभ्या राहून कपडे वाळत घालत होत्या. यावेळी स्टुलवरुन त्यांचा तोल गेल्याने त्या थेट खाली पडल्या, त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र तपासणीपुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
कपडे वाळत घालताना तोल गेल्याने आठव्या मजल्यावरुन पडून महिलेचा मृत्यू; पुण्याच्या जांभूळवाडीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 13:36 IST
रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तपासणीपुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी केले घोषित
कपडे वाळत घालताना तोल गेल्याने आठव्या मजल्यावरुन पडून महिलेचा मृत्यू; पुण्याच्या जांभूळवाडीतील घटना
ठळक मुद्देपतीवर मुंबईत उपचार सुरु असल्यानं मुलगाही मुंबईतच असतो