दापोडीच्या येथे चालत्या रेल्वेतून नदीपात्रात पडून महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 15:28 IST2018-03-19T15:28:22+5:302018-03-19T15:28:22+5:30
रविवारी रात्री लोणावळा पुणे लोकलने प्रवास करत असताना ही घटना घडली.

दापोडीच्या येथे चालत्या रेल्वेतून नदीपात्रात पडून महिलेचा मृत्यू
पिंपरी : दापोडीच्या हॅरिस पुलावरून चालत्या रेल्वेतून नदीपात्रात पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.
शितल सुमित लोहरे (वय २८, रा. आंबेडकर चौक, पडळवस्ती, खडकी) असे नदीपात्रात पडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शितल लोहरे रविवारी रात्री लोणावळा पुणे लोकलने प्रवास करत होती. लोकल हॅरिस ब्रिजवर आली असता ती लोकलमधून नदीपात्रात पडली. पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. संत तुकाराम नगर अग्निशामक विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तिचा मृतदेह अग्निशामक विभागाचे अशोक कानडे, विवेक खंदेवाड, अमोल चिपळूणकर, विनेश वाटकरे, भूषण येवले, प्रदीप हिले यांच्या पथकाने संत तुकाराम नगर अग्निशामक विभागाच्या जवानांनी महिलेचा मृतदेह बाहेर काढला.