मारहाणीमुळे गर्भपात झाल्याची महिलेची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:12 IST2021-03-20T04:12:04+5:302021-03-20T04:12:04+5:30

पुणे : आपल्याला मारहाण झाल्याने गर्भपात झाल्याचा आरोप पुण्यातील महिलेने केला आहे. कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दाखल ...

Woman complains of miscarriage due to beating | मारहाणीमुळे गर्भपात झाल्याची महिलेची तक्रार

मारहाणीमुळे गर्भपात झाल्याची महिलेची तक्रार

पुणे : आपल्याला मारहाण झाल्याने गर्भपात झाल्याचा आरोप पुण्यातील महिलेने केला आहे. कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दाखल झाली आहे.

२९ वर्षीय मनीषा भोसले आणि संतोष भोसले यांनी याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी याबाबत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

मार्च १७ या दिवशीच्या दुपारी ही घटना घडली आहे. संतोष आणि मनीषा भोसले हे दोघे उसाचे गुऱ्हाळ चालवतात. कोथरुड येथील गणेशकुंज सोसायटीमध्ये ते गाडा लावतात.

या ठिकाणी गाडा का लावतो म्हणून या सोसायटीचे रहिवासी जयेश अनिरुद्ध कुलकर्णी आणि अनिरुद्ध उद्धव कुलकर्णी यांनी आपल्याला विचारणा केली. या दोघांनी आपल्याला व पत्नीला मारहाण केली. या मारहाणीमुळे पत्नीला ससून रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यातुन आपल्या पत्नीचा गर्भपात झाल्याचा आरोप भोसले यांनी केला आहे. कोथरुड पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

Web Title: Woman complains of miscarriage due to beating