उसाची मोळी नेणाऱ्या महिलेला भरधाव कारने उडवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:10 IST2021-01-04T04:10:05+5:302021-01-04T04:10:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जेजुरी : जेजुरी-मोरगाव रस्त्यावर जवळार्जुन फाट्याजवळ डोक्यावर उसाची मोळी घेऊन जाणाऱ्या महिलेला भरधाव वेगाने ...

The woman carrying the sugarcane was blown away by a speeding car | उसाची मोळी नेणाऱ्या महिलेला भरधाव कारने उडवले

उसाची मोळी नेणाऱ्या महिलेला भरधाव कारने उडवले

लोकमत न्यूज नेटवर्क

जेजुरी : जेजुरी-मोरगाव रस्त्यावर जवळार्जुन फाट्याजवळ डोक्यावर उसाची मोळी घेऊन जाणाऱ्या महिलेला भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने उडविले. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने महिलेचा मृत्यू झाला.

कविता संजय जगताप (वय ३७, रा. जवळार्जुन, ता. पुरंदर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळार्जुन येथे राहणारे संजय भगवान जगताप यांचा जेजुरी-मोरगाव रस्त्यावरील जवळार्जुन फाट्यावर उसाच्या रसाचा गाडा आहे. या व्यवसायावरच त्यांचा उदरनिर्वाह आहे. जगताप व त्यांच्या पत्नी कविता संजय जगताप या रसाचा गाडा चालवितात.

शनिवारी (दि. २) दुपारी ३.३० च्या सुमारास कविता जगताप या उसाची मोळी आणण्यासाठी गेल्या. दुपारी चार वाजता डोक्यावर उसाची मोळी घेऊन रस्ता ओलांडताना एका भरधाव कारने कविता यांना धडक दिली. घटनेनंतर कारचालक फरार झाला. या प्रकरणी संजय जगताप यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गणेश दाभाडे तपास करीत आहेत.

Web Title: The woman carrying the sugarcane was blown away by a speeding car