बारामतीत हॉटेलमध्ये महिलेला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:11 IST2021-02-07T04:11:47+5:302021-02-07T04:11:47+5:30

रहाटवाडीत एकाला मारहाण -- रहाटवडे : रहाटवडे (ता. हवेली) येथे घरात बसलेल्या एका व्यक्तीला पूर्ववैमनस्यातून तिघांनी मारहाण ...

Woman beaten in hotel in Baramati | बारामतीत हॉटेलमध्ये महिलेला मारहाण

बारामतीत हॉटेलमध्ये महिलेला मारहाण

रहाटवाडीत एकाला मारहाण

--

रहाटवडे : रहाटवडे (ता. हवेली) येथे घरात बसलेल्या एका व्यक्तीला पूर्ववैमनस्यातून तिघांनी मारहाण केली व दम दिला त्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना रहाटवाडी येथे बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. गणेश बापू गोरे , कुलदीप ज्ञानेश्वर गोरे, अशोक प्रकाश गोरे असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिघांनी रमेश मारचंद्र हुंबे हे घरात बसलेले असताना अचानक गणेश, कुलदीप, अशोक या तिघांनी घरातघुसून त्याला काठीने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यामध्ये रमेश जखमी झाले. त्यांनी राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

---

कावळदरा येथे क्रिकेटवरून मारहाण--

राजगुरुनगर : क्रिकेट खेळताना एकाने बॅट आपटली त्यावरून आठ जणांनी मिळून एकाला मारहाण केली. ही घटना खेड तालुक्यातील कावळदार येथील नायफड गावाच्या हद्दीत घडली. याप्रकरणी महेश बुधा वायाळ, सखाराम हरिभाऊ तिटकारे, रवी चंदर ठोकळ, रोहिदास गिरजू कावळ, सुरेश कोठे, एकनाथ चंदर ठोकळ, चंदर देवजी ठेकळ, ज्ञानेश्वर हरिभाऊ तिटकारे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. रामदास वामन ठोकळ हे या मारहाणीत किरकोळ जखमी झाले. त्यांनी याबाबत खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

--

रागाने पाहिल्याने एकास मारहाण

कामशेत : पीकअप मधून जात असताना रागाने पाहिल्याच्या कारणावरून सहा जणांनी मिळून पीकअप चालकाला मारहाण केली. ही घटना उरगाव (ता. मावळ) येथे बुधवारी अडीचच्या सुमारास घडली. प्रवीण अशोक शिंदे, अशोक श्रीपती शिंदे, बाळू बबन शिंदे, निलेश अशोक शिंदे, बबन श्रीपती शिंदे, राणी अशोख शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी विजय विठ्ठल ठोंबरे हे किरकोळ जखमी झाले असून त्यांनी कामशेत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

---

पूर्ववैमनस्यातून महिलेला मारहाण

मंचर : पूर्वी झालेल्या भांडणामध्ये पोलिसात तक्रार केल्याचा राग मनात धरून बारा जणांनी मिळून एका महिलेला मारहाण केली. ही घटना मंचर जवळील जाधववाडी रांजणई येथे घडली. याप्रकरणी वैशाली विलास शिंदे, धनराज विलास शिंदे, गिरीष विलास शिंदे, शिरीष विलास शिंदे, कैलास सहादू शिंदे, सुनिला कैसाल शिंदे, युवराज कैलास शिंदे, प्रणव कैलास शिंदे, शांताबाई सहादू शिंदे, लक्ष्मीबाई सादू शिंदे, विमल सहादू शिंदे, विलास सहादू शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी प्रतिक्षा सुभाष जाधव यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

---

--

बपुण

Web Title: Woman beaten in hotel in Baramati