शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

इंदापुरात राजकीय बदलाचे वारे: हर्षवर्धन पाटलांनी कार्यकर्त्यांसमोर जाहीरपणे बोलून दाखवली खदखद, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 14:44 IST

पुढील तीन-चार दिवसांत आणखी काही कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण अंतिम निर्णय घेऊ, असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं आहे.

BJP Harshwardhan Patil ( Marathi News ) : भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगत आहे. अशातच आज पाटील यांनी इंदापुरातील आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या मेळाव्यात बहुतांश कार्यकर्त्यांनी आपण आता वेगळा निर्णय घ्यायला हवा, असा सूर आळवल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनीही आपल्या भाषणातून मनातील खदखद  बोलून दाखवत पुढील तीन-चार दिवसांत आणखी काही कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण अंतिम निर्णय घेऊ, असं सांगितलं आहे.

"लोकसभा निवडणुकीच्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत इंदापूरच्या जागेबाबत फडणवीस जो काही निर्णय घेतील, तो मान्य असेल, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यानंतर फडणवीस यांनीही आपल्या तालुक्यात येऊन सांगितलं की मी इंदापूर तालुक्यासह हर्षवर्धन पाटील यांचेही राजकीय पालकत्व घेत आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या पक्षाची एक यात्रा की जत्रा आपल्या तालुक्यात आली होती. यावेळी शासकीय योजनांच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही पार पडला. हा शासकीय कार्यक्रम असताना महायुतीतील घटकपक्ष असूनही आपल्याला निमंत्रण देण्यात आलं नाही. उलट विद्यमान आमदारांनाच पुन्हा तिकीट देण्याचे संकेत अजित पवारांनी दिले," असं म्हणत कार्यकर्ता मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, "आपण कोणताही वेगळा निर्णय जाहीर केलेला नसताना किंवा तसं काही वक्तव्य केलं नसताना आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे काही बोलले, ते का बोलले हे मला समजलं नाही. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत, आपण अपक्ष निवडणूक लढवावी, असं तुमच्यातील काही जण सुचवत आहेत. तर काहींचं म्हणणं आहे की दुसऱ्या एखाद्या पक्षात जावं. या सगळ्या भावना पुढील काही दिवसांत मी पक्षनेतृत्वाला सांगणार आहे. त्यासाठी मी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेईन," अशा शब्दांत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

दरम्यान, तुमच्या मनात काय चाललं आहे, याचा मलाही अंदाज आहे, असं कार्यकर्त्यांना म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी आजच्या मेळाव्यात अप्रत्यक्षपणे आपण तुतारी हाती घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत दिले आहेत.

इंदापूरचं राजकीय गणित

भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. १९९५ मध्ये तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांनी राजकारणात प्रवेश केला. २००९ पर्यंत हर्षवर्धन पाटील हे अपक्ष म्हणूनच निवडून येत होते. मात्र, त्यांनी काँग्रेसलाच झुकते माप दिले. त्यांचा सहकारातील अभ्यास पाहता काँग्रेसने सहकारमंत्री बनवले होते. २०१४ मध्ये अजित पवार यांचे निकटवर्तीय आमदार दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा पराभव केला. इतकंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमीच त्यांचा वचक कमी करण्याचा प्रयत्न केल्याचीही तालुक्यात चर्चा आहे. भाजपनेच तीच संधी साधून हर्षवर्धन पाटील यांना मैदानात उतरवले, पण त्याचा फारसा काही उपयोग झाला नसल्याने भाजपही नाराज असल्याचे समजते. 

लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत विधानसभेचे आश्वासन देत हर्षवर्धन पाटील यांना अजित पवारांचे काम करण्यास सांगितले. मात्र, तसे झालेच नाही. त्यातच सध्या उपमुख्यमंत्री अजित अजित पवार यांनी इंदापूर विधानसभेवर दावा सांगितला असून आमदार दत्तात्रय भरणे यांनाच उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या हालचाली वाढल्या आहेत.

दुसरीकडे, शरद पवार यांनी नेहमीच हर्षवर्धन पाटील यांना साथ दिली आहे. २००९ लोकसभा निवडणूक अटीतटीची झाली. त्यावेळी इंदापूर बाजार समितीत झालेली शेवटची सभा शरद पवार यांनी चांगलीच गाजवली अन् हर्षवर्धन पाटील निवडून आले. त्यानंतर पाटील हे जरी भाजपमध्ये गेले असले तरी वेळोवेळी पवारांनी त्यांना झुकते माप दिले. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कर्मयोगी साखर कारखान्याच्या सभासदांची आर्थिक कोंडी सुटावी म्हणून पुणे जिल्हा बँकेकडे २०० कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळावी म्हणून थेट शरद पवारांनी मध्यस्थी केली होती. त्यानंतर राष्ट्रीय साखर महासंघांच्या अध्यक्षपदी निवडीवेळीही पवारांनीच कळत न कळत पाठिंबा दिल्याचीही चर्चा आहे. यामुळे शरद पवारांबरोबर त्यांचे स्नेह कायम असल्याचे दिसते.

टॅग्स :harshvardhan patilहर्षवर्धन पाटीलBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार