'येवले चहा' बंद करणार का?; मालकांनी सांगितलं नेमकं काय चुकलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 11:30 AM2019-09-25T11:30:46+5:302019-09-25T11:31:00+5:30

'येवले अमृततुल्य'कडून मेलामाईन नावाचा पदार्थ वापरण्याचं कुठलंही कृत्य केलं जात नाही.

Will you stop 'Yeola tea' in pune ?; The owner navnath yevale told exactly what was wrong! | 'येवले चहा' बंद करणार का?; मालकांनी सांगितलं नेमकं काय चुकलं!

'येवले चहा' बंद करणार का?; मालकांनी सांगितलं नेमकं काय चुकलं!

googlenewsNext

अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या येवले चहाचे कोंढव्यातील उत्पादन केंद्र बंद ठेवण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) सह आयुक्त एस. एस. देशमुख यांनी दिले आहेत. येवले चहा प्यायल्याने पित्त होत नाही. तसेच, चहासाठी मिनरल वॉटर वापरले जात असल्याचा चुकीचा दावा त्यांना भोवला असून, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, पँकबंद मालावर कोणती माहिती नसणे अशा विविध नियमांचे उल्लंघन केल्याने पुढील आदेश येईपर्यंत उत्पादन केंद्र बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. मात्र, नवनाथ येवले यांनी आपच्या सर्व शाखा सुरूच राहतील, असे सांगितले आहे. 

'येवले अमृततुल्य'कडून मेलामाईन नावाचा पदार्थ वापरण्याचं कुठलंही कृत्य केलं जात नाही. एफडीएच्या अधिकाऱ्यांना पॅकिंगसदर्भात काही त्रुटी आढळून आल्या होत्या, त्याची पू्र्तता आम्ही केली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल झालेल्या बातम्यामधील मजकूरप्रमाणे मेलामाईन नावाचा पदार्थ आढळून आला नाही, आम्ही तो वापरतही नाही. ग्राहकांच्या जीवाशी खेळायचा अधिकार आम्हाला नाही, आमच्यावर तसे संस्कारही झालेले नाहीत. त्यामुळे, ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, आमच्या सर्व फ्रँचाईजी नेहमीप्रमाणे सुरूच राहतील, असे येवले अमृततुल्यचे संचालक नवनाथ येवले यांनी म्हटलं आहे. नवनाथ येवले यांनी एका व्हिडीओद्वारे आपली भूमिका मांडली आहे. 

येवले चहामधे मेलामाईनचा वापर केला जात असल्याचे वृत्त पसरले आहे. त्या पार्श्वभूमीवर एफडीएने कोंढव्यातील येवले फूड प्रॉडक्ट येथे तपासणी केली. चहा पावडर, साखर, चहा मसाला यांचे नमुने आणि सहा लाख रुपयांचा साठा संशयावरुन जप्त केला आहे. तसेच, अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. येत्या तीन आठवड्यात प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. मात्र, आम्ही पॅकिंगसंदर्भातील त्रुटी दूर केल्या असून शाखा नेहमीप्रमाणे सुरू राहतील, असेही स्पष्टीकरण येवले यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, येवले चहाची वृत्तवाहिनीवर जाहीरात प्रसिद्ध केली जाते. त्यात येवले चहा प्यायल्यावर पित्त होत नसल्याचा दावा केला जातो. तसेच, चहासाठी मिनरल वॉटर वापरले जाते. ही जाहीरात दिशाभूल करणारी असल्याचे एफडीएने म्हटले आहे. या प्रकरणी एफडीएचे सहायक आयुक्त संजय नारागुडे यांनी नोटीस बजावली आहे. तसेच, अॅडर्व्हटायझिंग स्टॅण्डर्ड कौंसिल ऑफ इंडियाकडे देखील तक्रार नोंदविल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अन्नसुरक्षा अधिकारी इम्रान हवालदार व रमाकांत कुलकर्णी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
 

Web Title: Will you stop 'Yeola tea' in pune ?; The owner navnath yevale told exactly what was wrong!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.