शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
4
"तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
5
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
6
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
7
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
8
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
9
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
10
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
11
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
12
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
13
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
14
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
15
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
16
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
17
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
18
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
19
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
20
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती

आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाचे काम पूर्ण होणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 18:18 IST

आषाढी वारीपर्यंत पालखी महामार्गाचे काम पूर्णत्वास जाईन का नाही, याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.

वाल्हे : आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आळंदीहून पंढरपूरकडे १९ जूनला प्रस्थान होत आहे. दिवे घाट ते नीरा या ५० किलोमीटर पालखी मार्गावरील चौपदरी करण काम अद्यापपर्यंतही सुरू असून, महामार्गावरील गावाजवळील बऱ्याच रस्त्यांचे काम अपूर्ण आहे. काही ठिकाणी एकाच बाजूने वाहतूक चालू असल्यामुळे छोटे-मोठे अपघात होत असतात. दौंडजच्या गावाजवळ तर काही जमीन अजून अधिग्रहण करण्याची बाकी असल्याचे माहिती पुढे येत आहे. त्यामुळे आषाढी वारीपर्यंत पालखी महामार्गाचे काम पूर्णत्वास जाईन का नाही, याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.

सासवड ते जेजुरी या मार्गाचे चौपदरीकरण गेली १७ वर्षांपूर्वी सुरू झाले. आजही काही ठिकाणी अर्धवट पद्धतीने काम झाले आहे, तर अनेक ठिकाणी पुलांची कामे अपूर्णावस्थेत आहेत. अशा ठिकाणी सुरक्षेच्या कोणत्याच उपाययोजना केलेल्या अद्यापपर्यंत दिसून येत नाही. पालखी सोहळ्याच्या एक-दोन दिवस आधी सुरक्षेचे तकलादू साधने लावली जातात. मात्र, पालखी परतीच्या प्रवासाआधीच ती नाहीसी झालेली असतात. पुन्हा बारा महिने या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. दरम्यान महामार्गावरील झाडांची कत्तल झाल्यामुळे यंदाही वारकऱ्यांना रखरखत्या उन्हातून पायी वारी करावी लागणार आहे.

पुरंदर तालुक्यातील पालखी मार्गावर पूर्वी जुनी व मोठी सावलीची झाडे होती. झाडांच्या मोठ्या प्रमाणावर पडणाऱ्या सावलीत वारकरी थोड्याफार विसावा घेत होते. मात्र, मागील दोन-तीन वर्षांपासून पालखी मार्गाचे रुंदीकरण सुरू झाल्याने मार्गावरील हजारो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे पालखी मार्गावर सध्या सावलीच राहिलेली नाही. पायी चालताना थोडावेळ उसंती घ्यायची असल्यास सावली शोधून सापडणार नाही. तर, वारकऱ्यांना पूर्णपणे उन्हात तापलेल्या मार्गावर पायी चालावे लागणार आहे. भविष्यात पालखी मार्ग रुंद होईल, पण किमान दहा वर्षे तरी या पालखी मार्गावर सावलीची झाडे येणे अशक्य असल्याचे वृक्ष प्रेमी बोलत आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जेजुरीच्या मुक्कामानंतर दुसऱ्या दिवशी वाल्हेकडे मार्गस्थ होताना दौंडज खिंडीत सकाळच्या न्याहरीसाठी विसावतो. या परिसरातील जुने वटवृक्ष, पिंपळसह अगदी छोटी बोराची झाड ही काढल्याने विसावा स्थळ भकास झाला आहे. शिवाय या ठिकाणी नुकतेच झालेले, रेल्वेचे लोहमार्गावर विस्तारीकरण.मुरूम भरण्याऐवजी या ठिकाणी काळी माती भरादरम्यान महामार्ग वरती रस्त्याच्या मधोमध डिव्हायडर करण्यात येत असून त्या डिव्हायडरमध्ये झाडे लावण्याचे काम चालू आहे, मात्र डिव्हायडरमध्ये माती भरण्याऐवजी मुरूम भरला जात असल्याने ही झाडे कशी मोठी होऊ शकतात, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. मुरूम भरण्याऐवजी या ठिकाणी काळी माती भरावी व वृक्षारोपण करावे, अशी मागणी होत आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी सोहळा पुरंदर तालुक्यात दाखल होण्यास अद्याप दीड महिना बाकी आहे. मात्र, यादरम्यान, पालखी महामार्गाचे काम पूर्ण होणे शक्य वाटत नसून, यावर्षीही पुरंदर तालुक्यातून पायी पालखी सोहळा अडखळतच जाईल ? अशी चर्चा तालुक्यातील गावागावात होत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड