शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

पुंरदरसाठीच्या ‘पॅकेज’ची लवकरच घोषणा? राज्य सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 09:29 IST

भूसंपादनाबाबत आतापर्यंत ६४० हरकती आल्या आहेत. येत्या ३० मेपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे.

पुणे :पुरंदरविमानतळासाठीच्या भूसंपदनावरून झालेल्या आंदोलनानंतर तिढा निर्माण झाला होता. मात्र, यानंतर राज्य सरकारच्या पातळीवर मोबदल्याबाबत चर्चा सुरू असून यांसदर्भात लवकरच पॅकेजची घोषणा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर हा तिढा सुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, एकूण भूसंपादन होणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ३ हजार शेतकरी भूमिहीन होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच, भूसंपादनाबाबत आतापर्यंत ६४० हरकती आल्या आहेत. येत्या ३० मेपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे.

प्रस्तावित पुरंदरविमानतळासाठी वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांमधील २ हजार ६७३ हेक्टरचे भूसंपादन केले जाणार आहे. मात्र, या भूसंपादनाला सर्व सात गावांतील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. भूसंपादनासाठी करण्यात येणाऱ्या ड्रोन सर्वेक्षणादरम्यान शेतकऱ्यांनी आंदोलन करत सर्वेक्षण बंद पाडले होते. त्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाधित शेतकऱ्यांची भेट घेत भूसंपादनाच्या मोबदल्याबाबत सात दिवसांत प्रस्ताव देण्यास सांगितले होते. असा प्रस्ताव न आल्यास राज्य सरकार १५ दिवसांत राज्य सरकार वेगवेगळ्या कायद्यानुसार मोबदल्याचे पॅकेजचा प्रस्ताव देईल, असे जाहीर केले होते. या घटनेला आता २२ दिवस उलटून गेले आहेत.

यासंदर्भात राज्य सरकारच्या वतीने जलदगतीने पाऊले उचलली जात असून, सरकारी पातळीवर चर्चा सुरू आहे. तसेच, इतर कायद्यांचा आधार घेऊन शेतकऱ्यांना मोबदला काय देता येईल, यावर सुद्धा विचारमंथन अंतिम टप्प्यात आले आहे. यासंदर्भातील पॅकेज पुढील काही दिवसांत घोषित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यानंतर शेतकऱ्यांची भूमिका काय राहणार, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. पुरंदरमधील या सात गावांमधील साडेचार हजार शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर एमआयडीसीचे शिक्के पडले आहेत. यातील तीन हजारांपेक्षा जास्त शेतकरी पूर्णपणे भूमिहीन होणार आहेत.भूसंपादनाबाबत ३० मेपर्यंत हरकती नोंदविता येणार आहे. आतापर्यंत ७९४ शेतकऱ्यांनी हरकती नोंदविल्या आहेत. यांनतर या हरकतीवर सुनावणी घेतली जाणार आहे, तर वनपुरी येथील शेतकऱ्यांनी हरकती मांडण्यासाठी अजून १० दिवसांची मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPurandarपुरंदरAirportविमानतळ