शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Sharad Pawar: राज्य सरकारही पेट्रोल - डिझेलच्या किंमतीत दिलासा देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 12:40 IST

दिवाळीची भेट म्हणून पंतप्रधान मोदींनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीचे दर कमी केले आहेत

बारामती/पुणे : केंद्राने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देशातील जनतेला दिलासा दिला आहे. दिवाळीची भेट म्हणून पंतप्रधान मोदींनी पेट्रोल आणि डिझेल किंमतीच्या दरात कपात केली आहे. पेट्रोल पाच आणि डिझेल दहा रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातही यांचे दर कमी होणार का? यावर जनतेचे लक्ष लागून आहे. त्यातच राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांनी पेट्रोल आणि डिझेलवर भाष्य केले आहे. याबाबत आम्ही राज्य सरकारसोबत बोलत असल्याचे पवार म्हणाले आहेत. बारामतीत स्नेहमेळाव्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

पवार म्हणाले, पेट्रोल डिझेलच्या दराबाबत नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी आम्ही राज्य सरकार सोबत बोलत आहोत. सरकारला याबाबत मार्ग काढण्यास निश्चितच सुचवलेलं आहे. परंतु केंद्र सरकारने राज्याचे जीएसटीची जे देणं लवकर द्यावं. ते दिल्यानंतर लोकांना मदत करण्याचा निर्णय घेणे शक्य होईल असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

''सद्यस्थितीत आपण हळूहळू संकटातून बाहेर निघत आहोत. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर नेहमीचा कारभार करू. गेल्या दोन वर्षात जे आर्थिक नुकसान झालं ते भरून काढू, अर्थव्यवस्था समाजव्यवस्था सावरण्याची काळजी घेणार असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.'' संपूर्ण खबरदारी घेऊन शुभेच्छा देण्या घेण्याचा कार्यक्रम पार 

''महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट आले. त्यामुळे आपल्याला काही पथ्य पाळावी लागली. आता हे संकट हळूहळू कमी होत आहे. महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर राज्य सरकारने अनेक दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले. त्याचा परिणाम होऊन कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत लोकांना भेटावं की नाही भेटावं या विचारात आम्ही होतो. पण लोकांच्या आग्रहामुळे आम्हाला हा कार्यक्रम घ्यावा लागला. कोरोनाबद्दलची संपूर्ण खबरदारी घेऊन शुभेच्छा देण्या घेण्याचा कार्यक्रम पार पडतोय.''

टॅग्स :BaramatiबारामतीSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारPuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदी