शहरं
Join us  
Trending Stories
1
Dombivli MIDC Explosion डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा आग, इंडो अमाईन कंपनीत स्फोट, नागरिकांत घबराट
2
सरकार स्थापनेनंतर रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी, घेण्यात आला मोठा निर्णय
3
मोठी बातमी: पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; प्रवक्त्याच्या सूचक पोस्टने चर्चांना उधाण
4
Rahul Gandhi : राम मंदिर बांधले तरी अयोध्येत भाजपाचा पराभव का झाला?; राहुल गांधींनी सांगितलं मोठं कारण
5
Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षी सिन्हा-जहीर इक्बाल रजिस्टर मॅरेज करणार? 23 जूनला होणार सेलिब्रेशन
6
सरपंच ते आमदार... आता ओडिशाचे मुख्यमंत्री; मोहन चरण माझी यांचा राजकीय प्रवास
7
१७ कोटी कॅश, ६८ किलो चांदी आणि सोन्याची बिस्किटं ...; मंदिरातील दानपेटीत कोट्यवधींचं दान
8
पतीच्या कायदेशीर कारवाईनंतर दलजीत कौर पुन्हा केनियाला गेली, दुसरं लग्न टिकवणार?
9
"हे 'नालायक' व्यक्तीच करू शकते", धर्माचा अपमान, अकमलचा माफीनामा पण भज्जीचा संताप कायम
10
Chandrababu Naidu Oath Ceremony : चंद्राबाबू नायडू आज चौथ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; PM नरेंद्र मोदी, अमित शाह उपस्थित राहणार
11
आमदार राजेंद्र राऊत यांच्या मध्यस्थीने मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्याची शक्यता
12
पाकिस्तानने सामना जिंकला, पण मोहम्मद रिझवानच्या नावे झाला 'हा' लाजिरवाणा विक्रम
13
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये लष्कराच्या चौकीवर दहशतवाद्यांकडून गोळीबार; ३ दिवसांत तिसऱ्यांदा हल्ला
14
लग्नाच्या चर्चांवर अखेर सोनाक्षी सिन्हाने सोडलं मौन, म्हणाली- "हा माझा निर्णय आहे..."
15
प्रसिद्ध पापाराझीने केली साऊथ इंडस्ट्रीची पोलखोल; साऊथ स्टारच्या नम्र वागण्याला म्हटलं ढोंग
16
९ ठार! वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांवर दहशतवादी हल्ला; रोहितची पत्नी भावूक, म्हणाली...
17
T20 WC 2024: टीम इंडिया आज तरी चूक सुधारणार? अमेरिकेविरूद्ध 'या' खेळाडूचा पत्ता कट?
18
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२४ : कौटुंबिक जीवनात आनंद राहील, नोकरीत पदोन्नती संभवते
19
T20 WC 2024 : न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाकडून टीम इंडियाचे स्वागत; पाहा PHOTOS
20
रखडलेली शिक्षक भरती सुरू होणार, आचारसंहिता लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी प्रक्रिया

Sharmila Thackeray : उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार का? शर्मिला ठाकरे म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 4:15 PM

कोणताही पक्ष संपत नसतो. बाळासाहेबांनी शिवसेनेची सुरूवात केली. खालचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत त्यांची बाळासाहेबांवर आजही निष्ठा आहे - शर्मिला ठाकरे

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेच्या अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झालं असलं तरी राज्यातील सत्तासंघर्षावर सोमवारी (२२ ऑगस्ट) रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्याच्या राजकारणात कायमच विचारला जाणारा प्रश्न म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? यावर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.

“साद घातली तर येऊ देत.. मग बघू,” असं शर्मिला ठाकरे विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या. पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. “कोणताही पक्ष संपत नसतो. तुम्ही कोणताही पक्ष पाहा तो पुन्हा लढत असतो. बाळासाहेबांनी शिवसेनेची सुरूवात केली. खालचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत त्यांची बाळासाहेबांवर आजही निष्ठा आहे. मायावती, पासवान यांच्या पक्षांकडे पाहा. मायावती यावेळी लढणार नव्हत्या, पण त्यांच्या मतांचा एक कोटा असतो,” असं त्या यावेळी म्हणाल्या.“केंद्रातील मंत्र्यांना कँटिनमध्ये जे काही मोफत मिळतं ते बंद करा. त्यांना बाहेर विकत घेऊन जेव्हा खायला लागेल तेव्हा किती महागाई वाढली आहे की नाही हे कळेल,” असं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या.

कोरोना काळात मंत्री लपून बसले होते

“कोरोना काळात आपले सगळे मंत्री लपून बसले होते, फक्त आरोग्यमंत्री टोपे बाहेर दिसायचे. तेव्हा आमच्या पक्षाच्या लोकांनी रस्त्यावर स्टॉल टाकून रेमेडीसिव्हिर इंजेक्शन, बेड मिळवून देणे, पीपीई किट देणे, मृतदेहांची विल्हेवाट लावण्यापासून सगळं केलं. यात आमच्या पक्षातील काही तरुण पोरं गेलीत. त्यामुळे ज्यांना आमचा पक्ष दिसत नाही, त्यावर आम्ही काहीच उपाय करू शकत नाही. तेव्हाही पक्ष होता आणि आताही असल्याचं त्यांनी सांगितलं.

टॅग्स :sharmila thackerayशर्मिला ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे