अशाने पुण्यात अभाविप'कडून व्याख्यानांच्या परवानग्या घ्याव्या लागतील ; कुमार सप्तर्षी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 02:35 PM2020-02-07T14:35:55+5:302020-02-07T14:37:57+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मॉडर्न महाविद्यालयाने मिळून री-व्हिजिटिंग गांधी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याच्या उदघाटनासाठी गांधी आणि  जेष्ठ सामाजिक कार्यकर्त अन्वर राजन यांना आमंत्रित केले होते. मात्र काही संघटनांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आमंत्रण रद्द करण्यात आले.

This will require lecture permits from ABVP in Pune; Kumar Saptarshi | अशाने पुण्यात अभाविप'कडून व्याख्यानांच्या परवानग्या घ्याव्या लागतील ; कुमार सप्तर्षी 

अशाने पुण्यात अभाविप'कडून व्याख्यानांच्या परवानग्या घ्याव्या लागतील ; कुमार सप्तर्षी 

Next

 पुणे : पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात री-व्हिजिटिंग गांधी या कार्यक्रमात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना दिलेले निमंत्रण रद्द केल्याने एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. इतकेच नव्हे तर हे निमंत्रण हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावाने रद्द केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे याच विषयावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मॉडर्न महाविद्यालयाने मिळून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याच्या उदघाटनासाठी गांधी आणि  जेष्ठ सामाजिक कार्यकर्त अन्वर राजन यांना आमंत्रित केले होते. मात्र काही संघटनांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आमंत्रण रद्द करण्यात आले. गांधी यांनी ट्विटरवरून याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. 

याबाबत सप्तर्षी म्हणाले की, ' राज्यपाल, कुलगुरू अशा पदांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक नेमल्यासारखे आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तर अन्य कोणत्याही विचारांच्या व्यक्तींचे कार्यक्रम करू देत नाहीत. अशावेळी पुणे पोलीस काय करतात हा प्रश्न आहे. जणू काही पोलिसांना समांतर व्यवस्था आरएसएस चालवत आहे. तुषार गांधींचा कार्यक्रम रद्द करणे संतापजनक आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी चौकशी करायला हवी. नाहीतर पुण्यात अभाविप'कडून व्याख्यानांच्या परवानग्या घ्याव्या लागतील. नव्या उद्धव ठाकरे यांच्या शासनाने यात लक्ष घातले पाहिजे. 

दुसरीकडे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष गजाजन एकबोटे यांनी मात्र याविषयी भूमिका मांडतांना व्याख्यान रद्द नाही तर स्थगित केल्याचे सांगितले. विद्यापीठ आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने हा कार्यक्रम आहे. त्यासाठी विद्यापीठाने फंडिंग दिलेले आहे.पतित पावन संघटने काही मुले आमच्याकडे आली. त्यांचे म्हणणे होते की विद्यापीठाच्या फंडिंग राजकीय भूमिका प्रदर्शित करणारे कार्यक्रम नको.त्यामुळे पाच हजार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न नको म्हणून आम्ही हा कार्यक्रम रद्द केला. मात्र संस्थेच्या फंडिंग मधून गांधींचा कार्यक्रम आयोजित करेन असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: This will require lecture permits from ABVP in Pune; Kumar Saptarshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.