बाबासाहेब पुरंदरेंच्या 'या' पुस्तकाचा अभ्यास राज ठाकरे करणार; तब्बल 200 पुस्तकांची खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 10:20 AM2022-05-18T10:20:33+5:302022-05-18T10:26:33+5:30

राज ठाकरे यांनी तब्बल दीड तास या पुस्तकाच्या दुकानात घालवून 50 हजार रुपयांची तब्बल 200 पुस्तकं त्यांनी खरेदी केली

Will Raj Thackeray study Babasaheb Purandare book Purchase of over 200 books | बाबासाहेब पुरंदरेंच्या 'या' पुस्तकाचा अभ्यास राज ठाकरे करणार; तब्बल 200 पुस्तकांची खरेदी

बाबासाहेब पुरंदरेंच्या 'या' पुस्तकाचा अभ्यास राज ठाकरे करणार; तब्बल 200 पुस्तकांची खरेदी

Next

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मंगळवारपासून पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. तर पुण्यात होणार्‍या आगामी जाहीर सभेची तयारी देखील त्यांच्या या भेटीतून होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पुस्तक प्रेमी असलेल्या राज ठाकरे यांनी मंगळवारी सायंकाळी पुण्यातील अक्षरधारा बुक गॅलरी या पुस्तकांच्या दुकानाला भेट दिली. या दुकानातून त्यांनी पन्नास हजार रुपयाहून अधिक पुस्तकांची खरेदी केली. राज ठाकरे यांनी तब्बल दीड तास या पुस्तकाच्या दुकानात घालवला. अनेक पुस्तकं चाळली. आणि 50 हजार रुपयांची तब्बल 200 पुस्तकं त्यांनी खरेदी केली. त्यांच्या या पुस्तक खरेदी मध्ये बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती, मराठा रियासत यांच्यासह ऐतिहासिक आणि आत्मकथा पर पुस्तकांचा समावेश आहे.

राज ठाकरे यांच्या पुस्तक खरेदी विषयी अक्षरधारा बुक गॅलरीचे रमेश राठिवडेकर यांनी माहिती दिली. ते म्हणाले, राज ठाकरे यांनी मंगळवारी सायंकाळी अक्षरधारा बुक गॅलरीला भेट दिली. जवळपास दीड तास त्यांनी दुकानातील पुस्तके चाळली. या दिड तासात त्यांनी तब्बल दोनशे पुस्तकांची खरेदी केली. यामध्ये ऐतिहासिक पुस्तकांचा सर्वाधिक समावेश आहे. त्यानंतर सामाजिक विषयावरील चरित्र-आत्मचरित्र आणि कलाविषयक पुस्तकांची ही त्यांनी खरेदी केली. जवळपास 50 हजार रुपयांहून अधिक पुस्तकांची त्यांनी खरेदी केली. 

बाबासाहेबांच्या या पुस्तकाचा अभ्यास करणार 

बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती, इतिहासकार सरदेसाई यांचे मराठी रियासत, वा सी बेंद्रे यांचा संपूर्ण संच, मृत्युंजय पुस्तकाची नवी आवृत्ती, यातील काही पुस्तके राज ठाकरे यांच्याकडे हो परंतु त्यांना नव्याने ही पुस्तके खरेदी केली आहेत. 

Web Title: Will Raj Thackeray study Babasaheb Purandare book Purchase of over 200 books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.