शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

गोवंशाच्या उत्तम संगोपनासाठी सरकारकडे प्रस्ताव मांडणार : डॉ. वल्लभ कथीरिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 13:11 IST

भारतीय संस्कृतीत देशी गोवंशाला सर्वोच स्थान दिले पाहिजे.

ठळक मुद्देदेशी गोवंश जागतिक परिषदेचे उद्घाटनप्रदर्शनात बी-बियाणांची विक्री

पुणे : भारतीय संस्कृतीत देशी गोवंशाला सर्वोच स्थान दिले पाहिजे. देशी गायीच्या दूध, गोमूत्र आणि गोबरपासून मानवी आरोग्य आणि गरजेच्या गोष्टी मिळतात.  देशी गोवंश जागतिक परिषदेत जो निष्कर्ष निघेल. त्यावर राष्ट्रीय कामधेनू आयोग गोवंशाचे उत्तम संगोपन आणि गोपालन होण्यासाठी भारत सरकारकडे प्रस्ताव मांडणार, असे मत राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष डॉ. वल्लभ कथीरिया यांनी व्यक्त केले. कामधेनू सेवा प्रतिष्ठानतर्फे २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत ग्यानबा सोपानराव मोझे कॉलेज समोर, बालेवाडी-हवेली येथे अर्थात देशी गोवंश जागतिक परिषदेचे उद्घाटन आज राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथीरिया यांच्या हस्ते अग्निहोत्र प्रज्वलीत करून झाले.या वेळी परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, नागपूर गोविज्ञान केंद्राचे सुनील मानसिंहका, भारतातील सगळ्यात मोठ्या गोशाळेचे संचालक महंत रवींद्रानंद सरस्वतीमहाराज, मथुरा वृंदावनचे सुहास महाराज, विक्रम मुरकुटे, प्रा. नितीन मर्कंडेय, जैविक जीवनशैली विज्ञानचे ताराचंद बेलची, संजय बालवडकर, कन्हेरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वरमहाराज, इस्कॉनचे विश्वस्त संजय भोसले, इस्कॉनचे विश्वस्त डॉ. जनार्दन चितोडे, दत्ता बहिरट तसेच कामधेनू सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक रत्नपारखी, उपाध्यक्ष विजय ठुबे, समीर देवधर, मिलिंद देवल उपस्थित होते. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. कथीरिया म्हणाले की, गोधनाचे महत्त्व नवीन पिढीपर्यंत पोहोचवायचे असेल तर त्याची उपयुक्तता वैज्ञानिक कसोटीवर सिद्ध करून दाखवावी लागेल. डॉ. विजय भटकर म्हणाले की, भारतीय संस्कृतीमध्ये गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गीता व गोमाता या दोन घटकांभोवती भारतीय संस्कृती गुंफलेली आहे. गोधनाकडे केवळ धार्मिक दृष्टीने न पाहता वैज्ञानिक दृष्टीनेदेखील पाहण्याची आवश्यकता आहे. देशातील आयआयटीसारख्या महत्त्वपूर्ण संस्था आता गोधनाच्या संदर्भात संशोधन करीत आहेत, ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. .......प्रदर्शनात बी-बियाणांची विक्रीआपल्या घराजवळील परिसरात अथवा घराच्या कुंडीमध्ये स्वत:च्या हाताने भाजीपाला तयार करावा या हेतूने स्वस्त दरात बी-बियाणांची विक्री करण्यात येत आहे. पोपट फोफसे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्याकडे काशी भोपळा, चाकवत, तांदूळ, मेथी, पालक, दोडका, करडई, बिट, कोबी, वांगे, दुधी भोपळा, तुळस, खरबुज, शेवगा यांच्या बिया ३० रुपये दराने विक्रीस उपलब्ध आहेत.....................भारतीय गायींच्या प्रदर्शनात विविध जातींचे देशी गोवंश राष्ट्रीय कामधेनू आयोगाने आयोजित केलेल्या भारतीय गार्इंच्या प्रदर्शनात लालकंदारी, कपिला, थारपारकर, कांकरेज, खिलार, गीर, गावरान, सहिवाल अशा विविध जातींचे देशी गोवंश आहेत. तसेच देशी गाईच्या गोमूत्रापासून तयार केलेली औषधे, गाईचे दूध, तूप, दंतमंजन, साबणे, विक्रीस ठेवले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेcowगायGovernmentसरकार