शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

ससूनमधील कोरोनाबाधित गंभीर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण‘प्लाझ्मा’रोखणार? प्लॅटिना प्रकल्पाला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 13:33 IST

राज्य शासनाकडून कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा उपचार पध्दतीचा जगातील सर्वात मोठा 'प्लॅटिना' प्रकल्प असल्याचा दावा

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात प्रत्येक रुग्णालयामध्ये २० ते २२ याप्रमाणे सुमारे ५०० रुग्णांवर उपचार केले जाणार

पुणे : कोरोनाबाधित गंभीर रुग्णांना प्लाझ्मा देण्याच्या राज्यातील प्लॅटिना प्रकल्पाला ससून रुग्णालयामध्ये सुरूवात झाली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे (आयसीएमआर) च्या रुग्णालयातील चाचण्या पूर्ण झाल्यानंतर आता हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे या टप्प्यात रुग्णालयातील गंभीर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण ‘प्लाझ्मा’ किती रोखणार, हे महत्वाचे ठरणार आहे.

कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा उपचार पध्दतीचा जगातील सर्वात मोठा प्लॅटिना प्रकल्प असल्याचा दावा राज्य शासनाकडून केला जात आहे. यामध्ये ससून रुग्णालयासह राज्यातील २३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांतील रुग्णांवर चाचण्या केल्या जाणार आहेत. जुन महिन्याच्या अखेरीस नागपुर येथील रुग्णालयातील या प्रकल्पाला सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात प्रत्येक रुग्णालयामध्ये २० ते २२ याप्रमाणे सुमारे ५०० रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. ससूनमध्ये ‘आयसीएमआर’च्या चाचणीमध्येही जवळपास तेवढ्या रुग्णांवर प्लाझ्माचे उपचार करण्यात आले आहेत. प्लॅटिनामध्ये ही संख्या वाढूही शकते. ही उपचार पध्दत प्रायोगिक पातळीवर असल्याने त्याच्या अभ्यासाअंती प्रकल्पाची व्याप्ती वाढविली जाणार आहे.

‘आयसीएमआर’कडून देशात विविध रुग्णालयांमध्ये ४५२ रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग केला आहे. त्याचा अहवाल अद्याप उघड करण्यात आलेला नाही. या प्रकल्पामध्ये ससून रुग्णालयाचाही समावेश होता. याअंतर्गत पहिला रुग्ण ठणठणीत बरा झाल्याची घोषणाही रुग्णालयाकडून करण्यात आली होती. आता प्लॅटिना प्रकल्पही सुरू झाल्याने अनेक गंभीर रुग्णांचा त्याचा फायदा होणार आहे. ससूनमध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीच्या चाचण्यांकडे सर्वांचेच लक्ष लागुन राहिले आहे.-----------------‘सीआरपीएफ’च्या जवानांचेही प्लाझ्मा दानराज्य राखीव पोलिस दला (एसआरपीएफ) पाठोपाठ आता केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) जवानही प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. एसआरपीएफच्या सुमारे २० जवानांनी आतापर्यंत प्लाझ्मा दान केले आहे. त्यामुळे ससून रुग्णालयामध्ये आता प्लाझ्मा दात्यांची संख्या वाढू लागली आहे. तसेच ‘प्लाझ्मा’चा साठाही वाढला आहे.  -----------------

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसsasoon hospitalससून हॉस्पिटलhospitalहॉस्पिटलState Governmentराज्य सरकारDeathमृत्यू