शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

निलेश लंके मुंबईत राहतील की दिल्लीत जाणार?; पवारांच्या चाणाक्ष उत्तराने पिकला हशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 19:18 IST

आमदार लंके यांनी थेट पक्षप्रवेश करणं आज तरी टाळलं असून मी शरद पवार यांच्याच नेतृत्वात काम करणार असल्याचं ते म्हणाले.

Sharad Pawar Pune PC ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही मतदारसंघांमधील राजकीय समीकरणे बदलत असल्याचं चित्र आहे. महायुतीकडून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज त्यांच्या पुण्यातील कार्यालयात भेट घेतली. यावेळी ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतील, अशी शक्यता होती. मात्र आमदार लंके यांनी थेट पक्षप्रवेश करणं आज तरी टाळलं असून  मी शरद पवार यांच्याच नेतृत्वात काम करणार असल्याचं ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर निलेश लंके यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाल्याने याबाबतची स्पष्टता यावी, यासाठी पत्रकार परिषदेत शरद पवार यांना एक कोड्यात टाकणारा प्रश्न विचारण्यात आला. मात्र पवार यांनी दिलेल्या चाणाक्ष उत्तराने तिथं चांगलाच हशा पिकला.

निलेश लंके हे नगर दक्षिणमधून लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार असतील का, याबाबतचा अंदाज यावा, यासाठी शरद पवारांना एक प्रश्न विचारण्यात आला. निलेश लंके हे मुंबईत राहतील की दिल्लीत जातील, असा तो प्रश्न होता. त्यावर शरद पवार यांनी लंके हे पारनेरमध्येच राहतील. तिथं दुष्काळ पडलेला असताना त्यांचं मुंबईत काय काम आहे, असं उत्तर देत लंकेंच्या उमेदवारीबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला आहे.

निलेश लंकेंबाबत काय म्हणाले शरद पवार?

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत निलेश लंके यांच्यावर स्तुतीसुमने उधळत शरद पवार म्हणाले की, "मी स्वत: निलेश लंके यांच्या प्रचारासाठी पारनेरमध्ये गेलो होतो. विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर निलेश लंके यांनी अखंडपणे पारनेरच्या जनतेची सेवा केली. मधल्या काळात त्यांचे काही निर्णय झाले असतील किंवा नसतील, मात्र त्यांची बांधिलकी पारनेरच्या जनतेसोबत प्रामाणिकपणे होती आणि जे लोक बांधिलकी टिकवतात त्यांच्यासोबत आमची साथ कायम असते. अनेक लोक विरोधी पक्षातलेही असतात, पण लोकांसाठी काम करतात, त्यांनाही मी प्रोत्साहन देतो. निलेश लंके हे आज पक्षाच्या कार्यालयात आले, मी त्यांचं स्वागत करतो."

दरम्यान, "सध्या दुष्काळाचं सावट आहे, पारनेरच्या भागात पाऊस-पाणी कमी आहे. अशा काळात चिकाटीनं काम करणारा लोकप्रतिनिधी तिथं असणं आवश्यक आहे आणि निलेश लंके यांच्या रुपाने तिथे तसा लोकप्रतिनिधी आहे, याचा आम्हाला आनंद आहे. जनतेची सेवा करण्यामध्ये ते कमी पडणार नाही. जिथे आवश्यकता असेल तिथे आमच्या सर्वांच्या साथ त्यांच्यासोबत राहील," असं आश्वासनही शरद पवार यांच्याकडून देण्यात आलं आहे.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAhmednagarअहमदनगर