शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 13:24 IST

जयंत पाटील यांनी पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी यासाठी आपण प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा विचार व्यक्त केला असून, शरद पवार यांनी यावर निर्णय घ्यावा, असंही ते म्हणाले.

पुणे -  राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या २६व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात पक्षात महत्त्वाचे घडामोडी पाहायला मिळाल्या. या सोहळ्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्याला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करावं, अशी इच्छा व्यक्त केली. मात्र, यावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं की, जयंत पाटील यांनी पत्र दिलं नाही आणि राजीनामाही दिलेला नाही. असं म्हणत त्यांनी खुलासा केला आहे.    

 जयंत पाटील यांनी पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी यासाठी आपण प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा विचार व्यक्त केला असून, शरद पवार यांनी यावर निर्णय घ्यावा, असंही ते म्हणाले. या विधानावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "जयंत पाटील यांनी केवळ आपला वैयक्तिक विचार मांडला आहे. पक्षात यावर सविस्तर चर्चा होईल. प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसेल, तर नवीन अध्यक्ष निवडीचा प्रश्नच उद्भवत नाही, असंही सुळे यांनी स्पष्ट केलं.त्यापुढे म्हणाल्या, जयंतराव हे पक्षाचे अतिशय महत्त्वाचे नेते आहेत. एवढे वर्ष प्रचंड मेहनत करून त्यांनी पक्ष वाढवण्याची चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या भाषणाचा काय अर्थ काढताय हे मला माहिती नाही. त्यांनी पक्षाला काही सूचना दिल्या असतील, तर ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे त्यावर विचार केला जाईल. असं मतही सुळे यांनी मांडलं आहे. दरम्यान, जयंत पाटील यांच्या विधानानंतर पक्षात काय निर्णय घेतला जातो. याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. जयंत पाटील यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यासोबत नात्याबद्दलही भाष्य करताना सांगितलं, अजित पवार आणि मी कुटुंब म्हणून नेहमी एकत्र आहोत. माझा आणि अजित पवारांचा प्रेमाचा पवित्र नातं हे जन्मापासून आहे. त्यामुळे त्यात अंतर याचा विषयी येत नाही आणि कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच आहोत. यात काही वाद नाही, माझ्यावर आणि पवार कुटुंबीयावर झालेले संस्कार आहेत. त्यात कधीच बदल होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे, राज्यभरात 'हुंडाबळी' प्रकरणावर जागरुकता निर्माण करण्यासाठी लवकरच दौरा करण्यात येणार असल्याची घोषणाही  सुळे यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटील