शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

'अन्न मिळेल, पण पाणी कठीण; १९७२ पेक्षा भयानक दुष्काळी परिस्थिती उद्भवणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 02:00 IST

अधिकाऱ्यांनी भ्रमात राहू नये; अन्यथा मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागेल, असे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी व्यक्त केले.

दौैंड : महाराष्ट्रात १९७२ च्या दुष्काळापेक्षा भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे. तेव्हा पाण्याचे नियोजन करणे काळाची गरज आहे. एकवेळेस अन्न मिळेल, पण पाणी मिळणे कठीण होईल. तेव्हा अधिकाऱ्यांनी भ्रमात राहू नये; अन्यथा मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागेल, असे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी व्यक्त केले.दौंड येथे टंचाई बैठकीत ते बोलत होते. शासकीय अधिकाºयांनी दुष्काळाच्या संदर्भात चालढकल केली, तर कुठल्याही अधिकाºयाला पाठीशी घातले जाणार नाही. या बैैठकीत टंचाई आराखड्याबाबत तालुकापातळीवर नियोजन आणि समन्वय नसल्यामुळे वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केली. पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश नवले यांनी खडकी येथील बंधारा वाहून गेल्याची खंत व्यक्त केली. या कामाची मी पाहणी करणार आहे. दोषी व्यक्तींवर कारवाई केली जाईल.मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे म्हणाले की, पुणे जिल्ह्याची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात ५0 टँकर सुरू झाले, ही गंभीर बाब आहे. त्यातच दौंड तालुक्यात ९ टँकर सुरू आहेत. तेव्हा टँकर कमी करण्यासाठी योग्य ते नियोजन झाले पाहिजे. जनावरांच्या चाºयाचा प्रश्न सुटला पाहिजे आणि याचबरोबरीने दुष्काळी परिस्थितीत रोजगारांना मजुरी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. टँकरने पाणी देत असताना पाण्याची गुणवत्ता तपासून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबरीने टँकरच्या फेºया वेळेवर होतात की नाही, याचीदेखील नोंद ग्रामस्थांनी आणि लोकप्रतिनिधींनी घ्यावी. जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे म्हणाले की, तालुक्यातील टँकर मंजुरीचे अधिकार स्थानिक पातळीवर तहसीलदारांना दिले पाहिजेत. त्यानुसार पाणीटंचाई कमी होण्यास मदत होईल किंबहुना टंचाईचे नियोजन होणे काळाची गरज आहे. सभापती झुंबर गायकवाड म्हणाले की, तालुक्यातील ८0 टक्के गावे पाण्याखाली आहेत, तर २0 टक्के गावे टंचाईग्रस्त आहेत.पंचायत समितीच्या माध्यमातून टँकर कमी करण्यासाठी आणि पाणीटंचाई भासणार नाही याचे नियोजन केले जाईल, अशी हमी गायकवाड यांनी दिली. उपसभापती प्रकाश नवले म्हणाले की, पाण्याच्या नियोजनाबरोबरीने जनावरांच्या चाºयाचा प्रश्नदेखील महत्त्वाचा आहे. त्यासाठी चारा छावण्यांचे नियोजन करणे गरजेचे आहे. पाटबंधारे खात्याने पाण्याचे नियोजन केल्यास टँकरची मागणी घटेल. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गटविकास अधिकारी गणेश मोरे यांनी टंचाई बैठकीचा आढावा घेऊन तालुक्यातील टंचाईची परिस्थिती स्पष्ट करुन यावर योग्य ते नियोजन केले जाईल, असे सांगितले. या वेळी तहसीलदार बालाजी सोमवंशी, पुणे जिल्हा महिला बालकल्याण समितीच्या राणी शेळके, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण सातपुते, गणेश कदम, सारिका पानसरे, पंचायत समिती सदस्या ताराबाई देवकाते यांच्यासह विविध शासकीय अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.उन्हाळ्यात बंधारा बांधला पावसाळ्यात वाहून गेलाटंचाई बैठकीत उपसभापती प्रकाश नवले म्हणाले की, खडकी येथे बंधाºयासाठी माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी खासदार फंडातून २६ लाख खोलीकरणासाठी आणि १४ लाख रुपये बंधारा उभारण्यासाठी निधी दिला. त्यानुसार उन्हाळ्यात बंधारा बांधला गेला आणि पावसाळ्यात कॅनॉलच्या पाण्याने अगदी तीन महिन्यांतच बंधारा वाहून गेला. जर हा बंधारा टिकला असता तर परिसराला पाण्याची टंचाई भासली नसते.

टॅग्स :droughtदुष्काळ