शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
6
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
7
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
8
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
9
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
10
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
11
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
12
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
13
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
14
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
15
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
16
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
17
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
18
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
19
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
20
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर बीआरटी धावेल का? पीएमआरडीएच्या हद्दीत नवीन सहा बीआरटी मार्ग निर्माण करण्याचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 12:14 IST

पिंपरी-चिंचवडमध्ये बीआरटी सुसाट आहे. आता पीएमआरडीएच्या हद्दीत सहा बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजित करण्यात आले

- अंबादास गवंडी पुणे : पीएमपीची वाहतूक जलद व्हावी, यासाठी आठ बीआरटी मार्ग बांधण्यात आले. परंतु, वाहतूककोंडीमुळे पुण्यातील बीआरटी मार्ग काढण्यात आले, तर पिंपरी-चिंचवडमध्ये बीआरटी सुसाट आहे. आता पीएमआरडीएच्या हद्दीत सहा बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजित करण्यात आले. यामुळे वाहतूक सुसाट होण्यापेक्षा कोंडीमुळे मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे महामार्गावर बीआरटी बांधले तरी धावेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी पुढील ३० वर्षांसाठीच्या एकात्मिक वाहतूक आराखडा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला. दरम्यान २०,५५० चौरस मीटर एवढ्या क्षेत्रासाठी हा आराखडा तयार करण्यात आला असून, पुढील ३० वर्षांत पीएमआरडीएच्या हद्दीत सहा नवीन बीआरटी मार्गचे जाळे नियोजित आहे.

यामध्ये रावेत ते राजगुरूनगर, गवळी माथा चौक ते शेवाळेवाडी, रावेत ते तळेगाव दाभाडे, चांदणी चौक ते हिंजवडी या ११७ किमी मार्गाबरोबर लोणी काळभोर ते केडगाव, भूमकर चौक ते चिंचवड चौक या ४६ किमी मार्गाचा समावेश आहे. या सहा नवीन बीआरटी मार्गामुळे पीएमपआरडीच्या हद्दीत वाहतुकीचा वेग वाढेल, असा निष्कर्ष काढण्यात आले आहे. सध्याची महामार्गाची अवस्था पाहता कोणत्याही ठिकाणी मुबलक जागा नाही. त्यामुळे आहे त्या मार्गावर रस्ता अरुंद पडत असून, वाहतूककोंडी होत आहे. त्यामध्ये आता बीआरटी बांधले, तर पुन्हा रस्ते अरुंद होऊन वाहतूक सुलभ न होता, कोंडीची शक्यता जास्त आहे.

पीएमआरडीएमुळे पीएमपीला फटका

पीएमपीकडून नागरिकांच्या सोयीसाठी पीएमआरडीएच्या हद्दीत प्रवासी सेवा देण्यात येते, परंतु या ठिकाणी अनेक वेळा पीएमपीच्या गाड्या रिकामे धावतात. त्यामुळे उत्पन्नात घट होते. त्याचा फटका पीएमपीला बसतो. शिवाय पीएमआरडीएकडून संचलनापोटी पीएमपीला आर्थिक मदत करताना हात आखडले जाते. संचलनापोटी देण्यात येणारे रक्कमही वेळेवर मिळत नाही. शिवाय नाशिक, मुंबई, नगर आणि सोलापूर महामार्ग रस्ता अपुरा ठरत आहे. त्या बीआरटी बांधल्यावर पुन्ही महामार्गाची रुंदी कमी होणार आहे. त्यामुळे पीएमआरडीएच्या हद्दीत बीआरटी बांधून कोणाचा फायदा होणार आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे. 

मोजक्याच गाड्या धावतात पीएमपी, पीएमआरडीच्या हद्दीत

मोजक्याच पीएमपीच्या गाड्या धावत असून, सरासरी ३० मिनिटांत एक बस धावते. वाढत्या लोकसंख्येनुसार गाड्यांची संख्या वाढली तरी त्याला मर्यादा येणार आहे. शिवाय पीएमपीचे ६४१ किमी व १८ नवे बस मार्ग सुचविण्यात आले आहेत. तर १० टर्मिनल तयार करण्यात येणार आहे. तसेच सहा नवे बीआरटी मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहे. याचा प्रवाशांना किती फायदा होईल, हे सांगता न येण्यासारखे आहे.

हे आहेत प्रस्तावित बीआरटी मार्ग

-रावेत ते राजगुरूनगर

-गवळी माथा चौक ते शेवाळेवाडी

-रावेत ते तळेगाव दाभाडे

-चांदणी चौक ते हिंजवडी

-लोणी काळभोर ते केडगाव

-भूमकर चौक ते चिंचवड चौक

आताची बीआरटी संख्या

एकूण बीआरटी मार्ग - आठ

धावणाऱ्या बस - १ हजार

प्रवासी संख्या - सात लाख

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकBus DriverबसचालकTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस