शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगलामध्येही त्रिपुराची पुनरावृत्ती घडवू : सुनील देवधर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 22:48 IST

पुण्यात आयोजित वसंत व्याख्यानमालेत त्रिपुरानंतर पश्चिम बंगालमध्येही परिवर्तन घडवू असा विश्वास त्रिपुरातील भाजपाचे शिल्पकार सुनिल देवधर यांनी व्यक्त केला.

पुणे : त्रिपुराप्रमाणेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीने लोकांना विकासापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे पुढचा क्रमांक पश्चिम बंगालचा असून तेथेही त्रिपुराची पुनरावृत्ती घडवून परिवर्तन आणू असा विश्वास भाजपाच्या त्रिपुरातील विजयाचे शिल्पकार सुनील देवधर यांनी व्यक्त केला.     वकृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यामालेच्या १४४ व्या ज्ञानसत्रात बदलता पूर्वांचल या विषयावर ते बोलत होते. देवधर म्हणाले, त्रिपुरामधून कम्युनिस्टांचे समूळ उच्चाटन केल्यानंतर भविष्यात आता इथली जनता त्यांना संधी देणार नाही. त्यामुळे त्रिपुरानंतर आता पश्चिम बंगालचा क्रमांक असून तेथेही त्रिपुराची पुनरावृत्ती घडवू. गेल्या २५ वर्षांपासून त्रिपुरातील माणिक सरकार यांच्या शासनाला येथील जनता कंटाळली होती. त्यांनी राज्याला विकासापासून वंचित ठेऊन तेथील जनतेवर अन्याय केला होता. स्वत:चा विकास आणि राज्य भकास अशी स्थिती निर्माण झाली होती. म्हणून पिचलेल्या जनतेने विकासाचा मार्ग स्वीकारला.     इशान्यकडेली जनतेबाबत बोलताना देवधर म्हणाले, इशान्यकडेली नागरिकांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोठा वाटा आहे. गांधीजींच्या हत्येनंतर नागालँडमध्ये सात दिवस बंद पाळण्यात आला होता. इशान्य भारतातल्या नागरिकांच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबाबत आम्हाला कधी सांगण्यातच आले नाही. आम्हाला महात्मा गांधी नंतर फक्त इंदिरा गांधी शिकवल्या. जे खरे योद्धे होते त्यांना दहशतवादी ठरविण्यापर्यंत काँग्रेसची मजल गेली होती. काँग्रेसला फक्त येथील सत्ता हवी होती.  देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून इशान्य भारताचे उपेक्षा पर्व सुरु झाले होते. ईशान्य भारताला विकासापासून वंचित ठेऊन काही राज्य स्वत:हून चीनच्या घशात घालण्याचा काहींचा डाव होता. ख्रिश्चन मिशनºयांकडून केले जाणारे धर्मांतर आणि दहशतवाद्यांचा धुमाकूळ ही तेथील मुख्य समस्या होती. ही समस्या आता काही प्रमाणात दूर झाली आहे. तेथील जनतेच्या मनात ते भारताचा घटक नसल्याचे बिंबवले जात होते, मात्र तेथील जनतेला ते भारतीय असल्याचा अभिमान आहे. इशान्य भारतात २८ दिवस राहणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहे. इशान्य भारतातील लोक हे आता परतीच्या मार्गावर असून ते स्वत:ला अभिमानाने भारतीय म्हणत आहेत.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघTripura Election Results 2018त्रिपुरा निवडणूक निकाल 2018