शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीव अनाथालय मंजूरीच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 22:08 IST

जिल्ह्यात केवळ कात्रज येथील प्राणी संग्रहालय या एकाच ठिकाणी प्राण्यांवर उपचार करणारी सक्षम यंत्रणा उपलब्ध आहे. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा गट कार्यरत आहे.

ठळक मुद्देदोन महिन्यांपूर्वी केंद्र शासनाकडे पाठविला प्रस्ताव

पुणे: कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय या एकाच ठिकाणी वन्यजीवांवर उपचार करण्याची सुविधा आहे. त्यामुळे वन विभागाने बावधन येथे वन्य जीवांसाठी अनाथालय उभारण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. तसेच या प्रकल्प उभारणीसाठी लागणा-या गोष्टींचा अभ्यास करून त्यावरील अहवाल तयार करण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे. या अनाथालयामध्ये जखमी झालेल्या वन्य प्राणी व पक्षांवर उपचार केले जाणार आहेत. जिल्ह्यात भीमाशंकर सारखे मोठे अभयारण्य असून पुणे जिल्ह्यात शेकरू,बिबट्या,वानर,माकड,कोल्हा,लांडगा हरिण,काळवीट,आदी वन्य प्राणी अढळून येतात. तसेच शहरात व इतर परिसरात विविध वन्य पक्षी आढळून येतात. काही कारणास्तव हे वन्य प्राणी जखमी होतात. तसेच आजारी पडतात. त्यामुळे त्यांच्यावर योग्यवेळी उपचार करणे आवश्यक असते. मात्र, जिल्ह्यात केवळ कात्रज येथील प्राणी संग्रहालय या एकाच ठिकाणी प्राण्यांवर उपचार करणारी सक्षम यंत्रणा उपलब्ध आहे. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा गट कार्यरत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून या ठिकाणी जखमी वन्य प्राणी उपचारासाठी आणले जातात. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून कात्रज उद्यान चालवण्यासाठी लागणारा निधी कमी पडत आहेत. प्राणीसंग्रहालयातील वन्य पक्षी व प्राण्याची संख्या आणि त्यांच्यावर होणारा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात संग्रहालयात वन विभागाकडून जखमी वन्य प्राणी उपचारासाठी दाखल केले जातात. रात्री दोन वाजता पाठविण्यात आलेल्या वन्य प्राण्यांवरही येथे उपचार केले जातात.परंतु, वन विभागाने आता स्वत:चे वन्यजीव अनाथालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव सुमारे दोन महिन्यांपूर्वी केंद्र शासनाकडे पाठविला आहे. मात्र,अद्याप या प्रस्तावास मंजूरी मिळालेली नाही...............................किरकोळ जखमी वन्य पशु,पक्षांवर स्थानिक पशु वैद्यकीय अधिकारी उपचार करतात.मात्र,वन विभागातर्फे गंभीर जमखी वन्य प्राणी व पक्षांसाठी वन्यजीव अनाथालय सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. बावधान येथील 9 एकर जागेत हे अन्याथाल सुरू करण्याचे प्रस्तावित असून त्यासंदर्भातील अभ्यासपूर्ण अहवाल तयार केला जात आहे. वन्यजीव क्षेत्रात काम करणारे अधिकारी व स्वयंसेवी संस्थांचे तज्ज्ञ अभ्यासक याबाबत प्रस्ताव तयार करत आहेत. त्यामुळे जखमी झालेल्या वन्य प्राणी व पक्षांवर उपचार करून त्यांना पुन्हा सोडून दिले जाणार आहे.                             व्ही.एम.भावसार, वन विभागाचे अधिकारी 

टॅग्स :PuneपुणेforestजंगलHealthआरोग्यdocterडॉक्टर