अक्कलकुव्यात चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 12:44 IST2018-06-10T12:44:01+5:302018-06-10T12:44:01+5:30

दुर्गम भागात घटना : कु:हाडीच्या दांडय़ाने मारहाण

Wife's murder in suspicion of character | अक्कलकुव्यात चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून

अक्कलकुव्यात चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून

नंदुरबार : चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा खून केल्याची घटना ओघाणीचा गुंबालआंबापाडा ता़ अक्कलकुवा येथे घडली़ 5 जून रोजी पतीन बेदम मारहाण केल्याने गंभीर जखमी पत्नीला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होत़े येथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला़  
ओघाणीचा गुंबालआंबापाडा येथील गणेश सिंगा पाडवी याने 5 जून रोजी पहाटेच्या सुमारास चारित्र्याचा संशय घेत पत्नी शेवंतीबाई गणेश पाडवी हीला मारहाण करण्यास सुरूवात केली़ मारहाणीदरम्यान त्याने घरातील लाकडी कु:हाडीचा दांडा शरीरावर जागोजागी मारला़ तसेच शेवंतीबाईच्या दंडावर चावा घेत तिचे रक्त पिऊन दोराने मारहाण केली़ लाकडी दांडय़ामुळे मुका मार लागल्याने शेवंतीबाई हीची प्रकृती गंभीर झाली होती़ तिच्या कुटूंबियांनी तिला तात्काळ नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल केले होत़े दरम्यान उपचार सुरू असताना महिलेचा शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला होता़ या घटनेची नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात नोंद होऊन शनिवारी मोलगी पोलीस ठाण्यात तो वर्ग करण्यात आला़ याबाबत मानसिंग पारशी वळवी रा़ सल्लीबार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश सिंगा पाडवी याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस निरीक्षक पंडीतराव सोनवणे करत आहेत़ 
 

Web Title: Wife's murder in suspicion of character