शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Video: अजित पवारांसाठी पत्नी सुनेत्रा यांचा खास उखाणा, राष्ट्रवादी नावाचाही उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 15:46 IST

पुण्यातील  एका सार्वजनिक कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्यासाठी घेतलेल्या उखाण्याची सोशल मीडियात चांगलीच चर्चा होत आहे.

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर राष्ट्रवादीतील प्रत्येक गोष्टींची राजकीय वर्तुळात चर्चा होते. त्यात, पवार कुटुंबातील इतर सदस्यांच्या भूमिकेकडे आणि हालचालींकडेही सर्वांचे लक्ष असते. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी राजकीय प्रवेशावर भाष्य करताना दादांनी ग्रीन सिग्नल दिल्यावर मी आहेच, असं म्हटलं होतं. तर, आता सुनेत्रा पवार याही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सक्रीय झाल्याचं दिसून येतं. पुण्यात मंगळागौर निमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी अजित पवारांसाठी खास उखाणा घेतला. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.  

पुण्यातील  एका सार्वजनिक कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्यासाठी घेतलेल्या उखाण्याची सोशल मीडियात चांगलीच चर्चा होत आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील महिला प्रदेशाध्यक्षा आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पुणे शहरात मंगळागौर कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यासाठी, प्रमुख पाहुणे म्हणून सुनेत्रा पवार यांचाही सहभाग कार्यक्रमात होता. या कार्यक्रमात अजित पवारांसाठी पत्नी सुनेत्रा पवार यांनी खास उखाणा घेतला. 

पतीसाठी उखाणा घेण्याची मराठमोळी पद्धत प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. त्यामुळे, पत्नीचा उखाणा किंवा उखाणा घेणाऱ्या महिलेच्या शब्दांकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते. येथील मंगळागौर कार्यक्रमात जेव्हा सुनेत्रा पवार यांना उखाणा घेण्याची विनंती झाली, त्यावेळी, त्यांनी अफलातून उखाणा घेत कार्यक्रमातील उपस्थितांची मने जिंकली. आता, हाच उखाणा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या माध्यमातून तो सर्वदूर पोहोचला असून राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही शेअर करत आहेत. 

असा घेतला उखाणा

गणपतीला वाहते दुर्वापांडुरंगाला वाहते तुळशीअजितरावांचे नाव घेतेराष्ट्रवादीसोबत मंगळगौरीच्या दिवशी

दरम्यान, या कार्यक्रमातच हा उखाणा अजित दादांपर्यंत लाईव्ह कार्यक्रमातून पोहचल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले. त्यावेळी, उपस्थित श्रोत्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली. 

अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या संसाराला ३७ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांना, पार्थ आणि जय पवार अशी दोन मुले असून पार्थ पवार हे राजकारणात सक्रीय आहेत.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPuneपुणेRupali Chakankarरुपाली चाकणकर