शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Video व्हायरलची धमकी देत पत्नीला लावले वेश्याव्यवसायाला; पुण्यातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 12:43 IST

तरुणी पोलिसात तक्रार करेल म्हणून त्याने तिच्यासोबत लग्नदेखील केले

पुणे : एका पबमध्ये दोघांची ओळख झाली. लग्न करतो, असे सांगून तिच्यासोबत त्याने शारीरिक संबंध ठेवले. त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले. त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीने त्याने तरुणीला वेश्याव्यवसायाला लावले. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील वडगावशेरी परिसरात समोर आला आहे. तरुणी पोलिसात तक्रार करेल म्हणून त्याने तिच्यासोबत लग्नदेखील केले. मात्र, त्यानंतरसुद्धा त्याचा हा प्रकार सुरूच राहिला.

या प्रकरणी एका ३० वर्षांच्या तरुणीने चंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१६ ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधीत वडगाव शेरी, गोवा, बेंगलोर, सिंगापूर येथे घडला आहे.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी तरुणी मूळची कोलकात्याची आहे. शहरातील एका पबमध्ये २०१६ मध्ये दोघांचा परिचय झाला होता. ओळख वाढल्यानंतर लग्नाच्या आमिषाने आरोपीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीने तिला वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. त्याने ग्राहक आणून फिर्यादीची किंमत ठरविली. ग्राहकाबरोबर तिला जबरदस्तीने गोवा येथे ४ दिवसांकरिता पाठविले. त्या ग्राहकाने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. फिर्यादीच्या घरी सांगण्याची व पोलीस रेडमध्ये अडकविण्याची धमकी देत वेगवेगळ्या ग्राहकांबरोबर बंगलुरू, गोवा येथे पाठवत असे. तसेच पासपोर्ट काढून दोन वेळा सिंगापूर येथे पाठवून फिर्यादीकडून वेश्याव्यवसाय करून घेतला.

मित्राच्या रूमवर फिर्यादीला ठेवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती झाली, तेव्हा औषध देऊन तिचा गर्भपात केला. फिर्यादी तक्रार करील, या भीतीने फिर्यादीसोबत आळंदी येथे लग्न केले. त्यानंतरही तिला ग्राहकांकडे पाठवून तिची शारीरिक पिळवणूक केली. या सर्व प्रकाराला कंटाळून तिने शेवटी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांनी पती व त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.

 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकProstitutionवेश्याव्यवसाय