महामार्गाचे रुंदीकरण संथगतीने
By Admin | Updated: August 10, 2015 02:57 IST2015-08-10T02:57:41+5:302015-08-10T02:57:41+5:30
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ देशातील दळणवळणाच्या व वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा राष्ट्रीय महामार्ग गेली कित्येक महिन्यांपासून रुंदीकरणाची वाट पाहतोय

महामार्गाचे रुंदीकरण संथगतीने
कापूरव्होळ : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ देशातील दळणवळणाच्या व वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा राष्ट्रीय महामार्ग गेली कित्येक महिन्यांपासून रुंदीकरणाची वाट पाहतोय.
महामार्ग रुंदीकरणासाठी दिलेला कालावधी दीड वर्षे उलटून गेलेली असताना महामार्गाचे रुंदीकरण चालूच आहे.
काम चालू असल्याचा निर्वाळा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व रिलायन्स इन्फ्राकडून वेळोवेळी
होताना दिसत असताना जागोजागी पुलांचे काम कासवगतीने होत आहे.
स्थानिक नागरिक व प्रवाशांना माहितीच नाही, की पुणे-सातारा महामार्गावर कोणकोणत्या ठिकाणी पूल उभारले जाणार? अतिसंवेदनशील वर्दळीच्या व अपघातग्रस्त ठिकाणी माहामार्गावर प्रथमत: पुलांची
उभारणी करून तेथील प्रश्न सोडविण्याची गरज होती. उदा. चेलाडी-नसरापूर, शिवापूर, कामथडी याठिकाणी पुलांची कामे प्रथमत: होणे आवश्यक होती. मात्र, दुसऱ्या ठिकाणी कामे सुरू आहेत. पण, ती कामे पूर्ण कधी होणार? अशी विचारणा नागरिक करताना दिसत आहेत.
पुणे-सातारा महामार्गाच्या बाह्यवळणाची कामे जागोजागच्या ठिकाणी ठप्प झाली असताना वाहतूकस्थित असलेल्या महामार्गाच्या दुतर्फा रस्त्याचे रुंदीकरण ज्या वेगाने व गतीने होणे आवश्यक आहे ते न होता अनावश्यक कामे चालू आहेत. रुंदीकरणाची कामे गतीने होत नसल्याने वाहतूककोंडी ही नित्याचीच व प्रवाशांना मनस्तापाची बनली आहे. त्यामुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे.