शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

अभ्यासक्रम लगेच कमी करण्याची घाई कशाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 08:15 IST

शिक्षण तज्ज्ञांचे मत : सुट्ट्या रद्द करून अभ्यासक्रम पूर्ण करावा

पुणे : अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्याबाबत घाई होत असून शासनाने प्रत्येक राज्यातील काही शिक्षण तज्ज्ञांशी चर्चा करून अंतिम निर्णयावर यावे. तसेच शैक्षणिक वर्षासाठी किती दिवसांचा कालावधी मिळतो, याचा विचार करूनच अभ्यासक्रम कमी करावा. दिवाळीच्या व उन्हाळ्यातील सुट्ट्या रद्द करून आवश्यक दिवस उपलब्ध होत असतील तर अभ्यासक्रम कमी करण्याची आवश्यकता नाही, असे मत शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

केंद्रीय मनुष्यबळ मंत्री डॉ. रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी अभ्यासक्रम कमी करण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले. परंतु,अभ्यासक्रम कमी करण्याबाबत आत्ताच विचार करण्याची आवश्यकता नाही. शैक्षणिक वर्षासाठी किती दिवस उपलब्ध होतात यावर सर्व काही अवलंबून आहे. पाठ्यपुस्तक आणि अभ्यासक्रम याबाबत नेहमीच गल्लत केली जाते. कोणत्या इयत्तेमधील विद्यार्थ्याला कोणते घटक येणे आवश्यक आहे, याचा विचार होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्याच्या क्षमता त्या-त्या इयत्तेमध्ये विकसित व्हायला हव्यात. केवळ सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएससीई) च्या शाळांसाठीच हा निर्णय लागू असणार आहे की राज्य शासनही याबाबत निर्णय घेणार आहे. हे पाहणे उत्सुकतेचे आहे.परीक्षा घेतली नाही तरी चालेल पण अभ्यासक्रम पूर्ण केला पाहिजे, असे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले.सप्टेंबर- आॅक्टोबरपर्यंत शाळा सुरू झाल्या तरी दिवाळीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या कमी करून सर्व अभ्यासक्रम पूर्ण करता येऊ शकतो. केंद्र शासनाने प्रत्येक राज्यातील काही शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घ्यावा. अभ्यासक्रम कमी करण्याची घाई करू नये.- डॉ. अ. ल. देशमुख,ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञशैक्षणिक काम करण्यासाठी किती दिवस उपलब्ध आहेत, त्यावर अभ्यासक्रम कमी करावा किंवा नाही हे ठरवावे. श्रावण, वाचन, लेखन आणि संभाषण क्षमता अधिक विकसित व्हायला हव्यात. पाठ्यक्रमातील कमी महत्त्वाचे घटक वगळले तरी काही हरकत नाही.- एन. के.जरग, माजी माध्यमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्यअभ्यासक्रमातील कमी महत्त्वाचे घटक वगळले तरी फारसा फरक पडत नाही. परंतु, कोणत्या इयत्तेमधील विद्यार्थ्याला काय आले पाहिजे. याबाबत निश्चित झालेल्या क्षमता तशाच ठेवाव्या लागतील.- हेमांगी जोशी, निमंत्रक, महाराष्ट्र शिक्षण हक्क मंच

टॅग्स :Educationशिक्षणPuneपुणे