शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
"कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
6
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
7
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
8
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
9
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
10
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
11
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
12
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
13
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
14
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
16
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
17
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
18
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
19
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
20
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव

आज आंदोलन करणारे लोक 'त्यावेळी' का शांत होते? आमदार रोहित पवार यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 14:47 IST

सावरकरांच्या मुद्द्यावर रोहित पवार बोलले...

बारामती (पुणे) : ज्या वेळी राज्यपाल महोदयांनी छत्रपती शिवराय आणि महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीत खालच्या पातळीवर वक्तव्य केले होते. त्यावेळी आज जे आंदोलन करणारे लोक शांत का शांत बसले होते, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी भाजपसह शिंदे गट आणि 'मनसे'ला केला आहे.

पवार म्हणाले, जेव्हा 'हर हर महादेव' चित्रपटात शिवरायांच्या बाबतीत खोटा इतिहास दाखविला गेला, कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठ्या पुतळ्याचा अवमान झाला त्यावेळी आज आंदोलन करणारे लोक  गप्प का बसले, याचे आश्चर्य वाटते.

सावरकरांचा इतिहास जाणून घेतला पाहिजे-

सावरकरांच्या बाबत काही बोलणार नाही. त्यांच्याबाबतचा माझा अभ्यास खरंच कच्चा आहे. अभ्यास नक्कीच करावा लागेल. मात्र याबाबत चर्चा झाली पाहिजे. शाहु, फुले, आंबेडकरांचा कोणताही विषय आला तिथे आपण त्यांचा  इतिहास माहिती असल्याने लढतो. हे लढत नाहीत, ती गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे सावरकर यांच्याबाबतचा खरा इतिहास समजला पाहिजे. राहुल गांधी यांनी दाखविलेल्या पत्रात काय लिहिले होते, सावरकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातील शब्द आणि शब्द समजून घेणे आवश्यक आहे, असं रोहित पवार म्हणाले.

...श्रेय मिळणार नसल्याने विकासकामांना स्थगिती-लोकांच्या हिताच्या कामाला नारळ फोडायला जाता येत नाही. श्रेय मिळणार नसल्याने विकासकामांना स्थगिती देण्यात येते. माझ्या मतदारसंघात केवळ मला श्रेय मिळू नये यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा विकास आराखडा, राशीनच्या देवीचा आराखडा आदी धार्मिक, विविध महत्वाच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. जामखेडच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेला विरोधकांच्या सांगण्यावरुन स्थगिती देण्यात आली आहे. सगळ्यात राजकारण पाहण्यापेक्षा लोकांचे हीत पाहा, लोक आता दुटप्पी राजकारण सहन करणार नाहीत. येत्या काळात लोक शांत बसणार नसल्याचा इशारा आमदार पवार यांनी दिला.

टॅग्स :PuneपुणेRohit Pawarरोहित पवार