शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

हृदयाचा ठाेका का चुकताेय? प्रकृती धडधाकट, नियमित व्यायाम, लक्षणे शून्य; तरीही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 09:59 IST

तरुण ठरताहेत बळी : अकाली मृत्यूचे प्रमाण वाढले

पुणे : हृदयविकाराला कारणीभूत असणारी काेलेस्टेरॉल, धूम्रपान, डायबेटिस, बीपी, आदी काेणतीही लक्षणे नसतानाही हृदयविकाराने मृत्यू हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषकरून याची काेराेना हाेऊन गेलेला २० ते ४० वयाेगटातील तरुण शिकार ठरताना दिसत आहे. हे प्रमाण १५ ते २५ टक्क्यांनी वाढले आहे, असे निरीक्षण पुण्यातील हृदयराेग तज्ज्ञांनी नाेंदवले आहे.

गेली दाेन वर्षे काेराेनाचा प्रादुर्भाव माेठ्या प्रमाणावर हाेता. आता हे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, तरुणांमधील हृदयविकाराचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढताना दिसत आहे. यामागे रक्त घट्ट हाेणे हे प्रमुख कारण असल्याचे हृदयराेगतज्ज्ञ सांगत आहेत. त्याचबराेबर इतरही घटक जे अद्याप समाेर आलेले नाहीत, तेही कारणीभूत असू शकतात, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

काेराेना आणि हृदयविकार विकाराचा संबंध काय?

- बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या हृदयराेग विभागाचे सहयाेगी प्राध्यापक डाॅ. हेमंत काेकणे म्हणाले, ‘सध्या २५ ते ४० वयाेगटांतील तरुणांमध्ये हृदयविकाराचा धक्का येण्याचे प्रमाण काेविडच्या आधीच्या तुलनेत २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहे. विशेष म्हणजे या तरुणांना हृदयराेगाचे जाेखमीचे घटक नसतानाही ही समस्या दिसून येत आहे.’- ससून रुग्णालयात दरराेज हृदयविकाराचे ४ ते ५ तरुण रुग्ण येतात व त्यांपैकी ९० टक्के रुग्णांना काेराेनाचा इतिहास आहे. तरुण वयात हृदयविकाराचे प्रमाण का वाढले, हे अद्याप निश्चित झाले नसले तरी काेराेना आणि हृदयविकार यांच्यामध्ये काहीतरी संबंध आहे.

''काेराेना व हृदयविकार यांच्यात थेट संबंध अद्याप प्रस्थापित झाला नसून त्याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर संशाेधन सुरू आहे. काेराेनामुळे हृदयराेगात वाढ झाल्याचे म्हटले जात आहे. पण, तसा संबंध अद्याप संशाेधनाद्वारे प्रस्थापित झालेला नाही. काेराेनात रक्त गाेठू शकते. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गाेठले जात असल्याने हृदयविकाराचे प्रमाण वाढू शकते. परंतु, याबाबत अद्याप संशाेधन सुरू आहे. आधीही तरुणांमध्ये हृदयराेग दिसून येत हाेता तसा ताे आताही दिसून येत आहे. त्यामुळे काेराेनामुळेच आहे, असे म्हणता येत नाही. - डाॅ. आनंद नाडकर्णी, वरिष्ठ हृदयराेग तज्ज्ञ''

टॅग्स :PuneपुणेHeart Attackहृदयविकाराचा झटकाHealthआरोग्यdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल