शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जरंडेश्वर कारखान्याची कागदपत्रं उघड करण्याची हिंमत अजित पवार का दाखवत नाहीत? किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 16:01 IST

शरद पवारांनी कितीही प्रमाणपत्रे दिली आणि उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्यावर कितीही हल्ले करायला लावले तरी हा महाराष्ट्र मी भ्रष्टाचार मुक्त केल्याशिवाय राहणार नाही.

पुणे : महाराष्ट्र राज्य को-ऑप बँक घोटाळा प्रकरणात ईडीने २ जुलै रोजी मोठी कारवाई करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांचा साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना जप्त केला आहे. ईडीची ही कारवाई अजित पवारांसाठी मोठा धक्का आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हल्लाबोल केला आहे. 

भाजप नेते किरीट सोमय्या हे गुरुवारी पुणे दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, माजी मंत्री बाळा भेगडे आदी उपस्थित होते. सोमय्या म्हणाले, साताऱ्यातील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नातेवाईकांच्या मालकीचा जरंडेश्वर कारखाना 65 कोटिना घेतला आणि त्यावर 700 कोटींचे कर्ज घेतले.शरद पवारांना यासाठी सहकार चळवळ हवी आहे का ? जरंडेश्वर कारखान्याची कागदपत्रे उघड करण्याची हिम्मत अजित पवार का दाखवत नाहीत? असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला. 

शरद पवारांनी कितीही प्रमाणपत्रे दिली आणि उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्यावर कितीही हल्ले करायला लावले तरी हा महाराष्ट्र मी भ्रष्टाचार मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरेंच्या डर्टी एलेव्हन मध्ये जितेंद्र आव्हाड या बाराव्या खेळाडूंचा समावेश झाला आहे. त्याबाबतचे पुरावे लवकरच समोर आणणार असल्याचेही सोमय्या यांनी यावेळी सांगितले. 

काय आहे नेमकं प्रकरण ? सातारा येथील जरंडेश्वर साखर कारखाना हा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या मालकीचा आहे. घाडगे हे अजित पवार यांचे जवळचे नातेवाईक आहेत. राज्य सहकारी बँक घोटाळ्याचा तपास सुरू असताना जरंडेश्वर कारखान्याने बँकेकडून कर्ज घेऊन ते बुडवल्याचं स्पष्ट झालं. यावरुनच ईडीने आता कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. हा कारखाना आधी सहकारी स्वरुपाचा होता. मात्र नंतरच्या काळात त्याची विक्री होऊन खासगीकरण झालं होतं.

 

टॅग्स :PuneपुणेKirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार