शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही कशासाठी घराबाहेर पडता? पुणेकरांच्या लॉकडाऊनमधील समस्या जाणून घेण्यासाठी पोलिसांचा सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 20:35 IST

रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍यांची संख्या अजूनही मोठी..

ठळक मुद्देलॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी नागरिकांना घरात रहा असे केले आवाहनकोरोना विषाणूचा प्रसार कोणत्या मार्गाने कमी करता येईल हे जाणून घेण्यासाठी हा सर्व्हे.. हा सर्व्हे मंगळवारपासून सुरु करण्यात आला असून नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद

पुणे : लॉकडाऊनच्या काळात शहरातील नागरिक कोणत्या कारणांसाठी सर्वाधिक वेळा घराबाहेर पडत आहे, त्या समस्या समजून घेऊन त्या कशा सोडवता येतील, याचा आराखडा तयार करण्यासाठी शहर पोलीस दलाकडून ऑनलाईन सर्व्हे केला जात आहे. त्याचबरोबर कोरोना विषाणूचा प्रसार कोणत्या मार्गाने कमी करता येईलहे जाणून घेण्यासाठी हा सर्व्हे केला जात आहे.

लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी नागरिकांना घरात रहा असे आवाहन केले. केवळ अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दिवसातील काही वेळ सवलत दिली. वाहन वापरावर निर्बेध आणले, तरीही रस्त्यावरील व भाजी मार्केटमधील गर्दी कमी होताना दिसली नाही़. विनाकारण फिरणार्‍यांची संख्या अजूनही मोठी आहे.  त्यामुळे नागरिकांच्या नेमक्या कोणत्या गरजा आहेत. ज्यासाठी ते जास्त वेळा घराबाहेर पडत आहे. ही गरज व त्यांच्या अडचणी कशा सोडविता येतील, हे जाणून घेण्यासाठी हा सर्व्हे घेतला जात आहे. या सर्व्हेत सहभागी होऊन विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे नागरिकांनी द्यावीत, असे आवाहन सोशल मिडियावर पोलिसांकडून करण्यात येत आहे.या सर्व्हेत कौटुंबिक माहिती विचारण्यात आली असून आपण काय आणण्यासाठी व किती वेळा घरातून बाहेर पडता. लॉकडाऊनच्या काळात आपल्याला कोणत्या अडचणी येत आहे. लॉकडाऊन/घरी जाणे / बाहेर जाणे इत्यादीमुळे आपण कोणत्या आव्हानांना सामोरे जात आहात? आपण पुण्यात राहत. ते ठिकाण, कोरोना विषाणूला नियंत्रित करण्यासाठी पोलीस अधिकारी यांना काही सूचना, राज्य / जिल्हा प्रशासनाला काही सूचना आणि पुणे पोलिसांची कोणती कारवाई/दृष्टीकोन तुम्हाला आवडला असे काही प्रश्न व आपली मते मागविण्यात आली आहेत.https://twitter.com/PuneCityPolice/status/1262714137898971142?s=19

हा सर्व्हे मंगळवारपासून सुरु करण्यात आला असून नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नियमित मास्क व सॅनिटायझर वापरणे, सामाजिक अंतर पाळणे ही आता आपली जीवनशैली होणार आहे. या गोष्टी आपल्या दैनंदिन स्वभावात येणे गरजेचे आहे. त्यासाठी काय केले पाहिजे, हे समजून घेण्यासाठी हा सर्व्हेमदत करणार आहे. डॉ. के़ व्यंकटेशम, पोलीस आयुक्त, पुणे 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस