समृद्ध जीवनशैलीचं ठिकाण म्हणजे 'तळेगाव'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:29 PM2019-02-19T12:29:17+5:302019-02-19T12:33:40+5:30

पुणे आणि मुंबई या महत्त्वाच्या शहरांना तळेगाव चांगल्यारीतीने जोडलेलं आहे.

Why choose Talegaon for a prosperous lifestyle | समृद्ध जीवनशैलीचं ठिकाण म्हणजे 'तळेगाव'

समृद्ध जीवनशैलीचं ठिकाण म्हणजे 'तळेगाव'

Next

पुणे : सह्याद्रीच्या रांगांनी वेढलेलं आणि हिरवाईमध्ये हरवलेलं असं तळेगाव शहर आहे. येथील निसर्गरम्य वातावरण, दळणवळणासाठी रेल्वे आणि महामार्ग, दर्जेदार शिक्षण व अत्याधुनिक सुविधा, रोजगार, पुणे व मुंबईशी असलेली कनेक्टिव्हिटी आणि ग्राहकांच्या बजेटमध्ये बसणाऱ्या घरांच्या असंख्य पर्यायांमुळे तळेगाव एक समृद्ध जीवनशैलीचं ठिकाण म्हणून विकसित होत आहे.

पुणे आणि मुंबई या महत्त्वाच्या शहरांना तळेगाव चांगल्यारीतीने जोडलेलं आहे. दख्खनच्या पठारामध्ये वसलेलं आणि लोणावळ्यापेक्षाही जास्त म्हणजे 300 फूट उंचीवर असल्यामुळे तळेगावातलं वातावरण वर्षभर थंड आणि शांत आहे. त्यामुळे वीकेण्ड घालवण्यासाठी तळेगाव एक आदर्श ठिकाण आहे. याशिवाय, तळेगाव आणि त्याच्या आसपासच्या परिसरातला वाढता औद्योगिक पसारा पाहता रोजगारांच्या असंख्य संधी तिथे निर्माण होताना दिसत आहेत.

याठिकाणी मोटार्स, फोक्‍सवॅगन, जेसीबी यासारख्या मोठ्या कंपन्या आधीच स्थिरावल्या आहेत. तळेगावपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या चाकणमध्ये औद्योगिक विकास झाल्यामुळे देशभरातला तरुणवर्ग रोजगारासाठी तिथे येत आहे. त्याचबरोबर, तळेगावपासून अवघ्या तासाच्या अंतरावर पुण्यातील हिंजवडी आयटी हब आहे.

तळेगावाला पायाभूत सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. कारण स्थानिक पालिका चांगली कामगिरी करत आहे. म्हणूनच येथील चांगले रस्ते, पाणी आणि लोकांची सुरक्षितता यात तळेगाव आघाडीवर आहे. यासोबतच, येथील प्रॉपर्टी मार्केट वधारू लागलं आहे. तळेगाव शहरात अनेक गृह प्रकल्प सुरू आहेत. 

अलीकडच्या काळात तळेगाव चांगलंच गृह प्रकल्प विकसित होत आहे. पुणे-मुंबई शहरांमध्ये जागेच्या टंचाईमुळे लोक तळेगावला प्राधान्य देत आहेत. आपल्याला आवडणारं आणि बजेटमध्येही बसणारं घर घेण्याची इच्छा असणारी मंडळी तळेगाव हाच पर्याय निवडताना दिसत आहेत. कारण स्वस्त दरात नागरिकांना तळेगावमध्ये घरं मिळत आहेत.

तसेच, येथील गृह प्रकल्पामध्ये मुलांसाठी चिल्ड्रन पार्क, जिम, जाँगिग ट्रॅक, वाचनालय, विरंगुळा केंद्र, मंदिर अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील शैक्षणिक सुविधा वाढल्या आहे. त्यामुळे मुलांचा शैक्षणिक, सर्जनशीलता, सामाजिक आणि शारीरिक विकास होत आहे.

हवामानापासून शहरी सुविधांपर्यंत आणि दर्जेदार शिक्षणापासून  नोकरीच्या अगणित संधींपर्यंत दैनंदिन आयुष्यातल्या सर्व आघाड्यांवर झपाट्याने प्रगती करणाऱ्या तळेगावात हॅपिसीटी, इकोसिटी २.०, आयकॉनिक असे सर्वोत्कृष्ट  गृहप्रकल्प नम्रता गृप उभारते आहे. इथला भाव आणि तळेगाव शहराचं वाढतं महत्व बघता, इथे घर घेण्याच्या निर्णयाचा तुम्हाला कधीच पश्चात्ताप होऊ शकत नाही.

Web Title: Why choose Talegaon for a prosperous lifestyle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.