शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra election 2019 : पुण्यात भाजपने का गमावल्या दोन जागा ; आवर्जून वाचावे असे विश्लेषण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 15:32 IST

शहरातील विधानसभेच्या आठही जागांवर वर्चस्व असतानाही त्यातील दोन जागा गमवाव्या लागण्यावर भाजपाच्या शहर शाखेत आता चिंतन सुरू झाले आहे. मात्र या स्थानिक चिंतनाचा रोष थेट वरिष्ठांवर जात असून भ्रष्टाचारासारखे गंभीर आरोप होत असतानाही पाठीशी घातले गेले त्याचाच हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.

राजू इनामदार  पुणे: शहरातील विधानसभेच्या आठही जागांवर वर्चस्व असतानाही त्यातील दोन जागा गमवाव्या लागण्यावर भाजपाच्या शहर शाखेत आता चिंतन सुरू झाले आहे. मात्र या स्थानिक चिंतनाचा रोष थेट वरिष्ठांवर जात असून भ्रष्टाचारासारखे गंभीर आरोप होत असतानाही पाठीशी घातले गेले त्याचाच हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. या दोन जागा तर गमावल्याच शिवाय अन्य तीन जागांवर निसटता विजय मिळाल्याने त्यावरही बोलले जात आहे. लोकसभेच्या विजयाची पक्षातील लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना चढलेली झिंग मतदारांच्या या झटक्याने ओसरली असल्याचे काही पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा कानोसा घेतला असल्याचे निदर्शनास येते आहे.           ज्या बळावर भाजपाकडून शहरातील विरोधकांना त्यांचे अस्तित्त्वच दिसत नसल्याची टिका केली जात होती ते बळच आता ओसरले आहे. मागील ५ वर्षातील स्थानिकपासून ते दिल्लीपर्यंतच्या सर्वच निवडणुकांमध्ये भाजपाला पुण्यात भरघोस यश मिळाले. लोकसभेच्या दोन्ही निवडणूका, त्या मधल्या काळात युती नसताना झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने आठही विधानसभा मतदारसंघांवर वर्चस्व मिळवले. त्यानंतर पालिकेची निवडणूक झाली त्यात ९८ नगरसेवक निवडून आणले व स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवले. तेव्हापासूनच भाजपाचा पुण्यातील राजकीय रथ जमीनीपासून चार अंगूळे वरून चालू लागला.             दिल्लीत व राज्यात जे राजकारण खेळले गेले तेच गल्लीतही सुरू झाले. भाजपाच्या पालिकेत निवडून आलेल्या ९८ नगरसेवकांमध्ये तब्बल ३२ नगरसेवक हे दुसºया पक्षातून घेतलेले आहेत. तोच प्रकार आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला. काँग्रेसमधील अनेक माजी नगरसेवकांना, नेत्यांना पक्षाने विधानसभा मतदारसंघातील त्यांचे प्राबल्य लक्षात घेऊन पक्षात प्रवेश दिले. हा प्रकार इतका वाढला की मतदानास फक्त ८ दिवस असताना वडगावशेरीतील राष्ट्रवादीचे माजी आमदार बापू पठारे यांना मुख्यमंत्र्यांनी मुंबईत वर्षा बंगल्यावर भाजपात प्रवेश दिला. मतदारांना भाजपाचा हा धूडगूस आवडलेला नाही. राज्यातील मतदारांनी जो इशारा दिला अगदी तसाच इशारा पुणेकर मतदारांनी भाजपाला दिला.  हडपसरमध्ये योगेश टिळेकर यांच्यावर असंख्य आरोप झाले. त्यात महागडी चारचाकी गाडी भेट घेण्यापासून ते एखाद्या कामात निविदा दाखल करण्यापर्यंतचे अनेक आरोप होते. त्यातील काही कागदपत्रांसह केले गेले. असे असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जाहीर कार्यक्रमांना हजेरी लावली. भाषणांमध्ये त्यांचे गुणगान गायले. आरोप जसे जनतेत गेले तसे हे गुणगानही गेले.

       जनतेने ते लक्षात ठेवून टिळेकरांना, पर्यायाने भाजपाला नाकारले हे स्पष्ट दिसत असल्याचे भाजपातील काही जुन्या, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे मत आहे. त्याचवेळी आम्ही त्यांना जरा जपून चाला असा इशारा दिल्याचे पक्षातील काही ज्येष्ठ कार्यकर्ते आता सांगत आहेत. विरोधकांना सन्मान देणे जणू विसरले असल्याचेच भाजपाच्या नेत्यांचे वर्तन त्यांच्या नव्हे तर पक्षाच्या अंगाशी आले असे स्पष्ट मत हे कार्यकर्ते व्यक्त करतात.  दोन पराभवांबरोबरच शिवाजीनगर, खडकवासला व कॅन्टोन्मेट या तीन विधानसभा मतदारसंघातील निसटते विजयही भाजपाला खंत वाटावी असेच आहेत. त्यावरही पक्षात चर्चा होते आहे. या तीनही मतदारसंघांमध्ये विरोधकांनी भाजपाला दमवले. तिथेही स्थानिक विरोधकांना भाजपाकडून कस्पटाप्रमाणे लेखले व वागवले गेले. मतदारांना भाजपा पदाधिकारी, आमदार यांचे हे वर्तन दिसत होते. भाजपाचे हे ज्येष्ठ कार्यकर्ते सांगतात की ही भाजपाची संस्कृती नव्हती, पण काहींनी ती आणली, मतदारांना ते आवडलेले नाही हेच त्यांनी मतांच्या माध्यमातून सांगितले. पक्षाच्या नेता स्तरावर आता यासंदर्भात चर्चा, चिंतन व्हायचे तेव्हा होईल, कार्यकर्ता व माजी पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ता स्तरावर मात्र आताच सुरू झाले आहे.

टॅग्स :BJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Politicsराजकारण