शहरं
Join us  
Trending Stories
1
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
2
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
3
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
4
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
5
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
6
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
7
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
8
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
9
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
10
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
11
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
12
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
13
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
14
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
15
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
16
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
17
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
18
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
19
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
20
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
Daily Top 2Weekly Top 5

मिळकत कर सवलतीसाठी नव्याने अर्ज कशाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 10:20 IST

निर्णयाचा फेरविचार करण्याची माजी नगरसेवकांची मागणी

पुणे : सौरऊर्जा, गांडूळ खत आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा असलेल्या मिळकतींना महापालिका अनेक वर्षे मिळकत करात सवलत देते. ही सवलत आगामी बिलातही मिळविण्यासाठी मिळकतधारकांनी नव्याने अर्ज करावेत, असे आदेश महापालिकेने काढले आहे. त्यावर या सवलतीसाठी अर्ज नव्याने करण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी माजी नगरसेवकांनी केली आहे.

सौरऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिग आणि गांडूळ खत प्रकल्प असे पर्यावरणपूरक प्रकल्प उभारलेल्या सोसायट्यांना किंवा अन्य मिळकतधारकांना महापालिकेतर्फे मिळकत कराच्या सर्वसाधारण करात ५ ते १० टक्के सवलत दिली जाते. प्रामुख्याने कोणताही एक प्रकल्प असल्यास मिळकतकराच्या सर्वसाधारण करात ५ टक्के, तर दोन प्रकल्प असल्यास १० टक्के सवलत दिली जाते. सोसायटीने हे प्रकल्प उभारलेले असल्यास सर्व सदस्यांना सवलतीचा लाभ मिळतो.महापालिकेतर्फे शहरातील अशा प्रकारे प्रकल्प उभारलेल्या सुमारे एक लाख २८ हजार मिळकतींना मिळकत करात सवलत दिली जाते. या मिळकतींना दिल्या जाणाऱ्या सवलतीची एकूण रक्कम दरवर्षी ९ कोटी रुपयांहून अधिक होते. मात्र, ही सवलत घेतल्यानंतर अनेक ठिकाणी हे प्रकल्प बंद असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सौरऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, व्हर्मिकल्चर प्रकल्प उभारलेल्या मिळकतधारकांनी २५-२६ या आर्थिक वर्षासाठी सवलत मिळविण्याकरिता १५ फेब्रुवारीपूर्वी लगतच्या क्षेत्रीय कार्यालयात अर्ज सादर करावेत. पूर्वीपासून ही सवलत घेतलेल्या; परंतु प्रकल्प बंद असलेल्या मिळकतधारकांची सवलत बंद केली जाईल. मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे आदेश उपायुक्त माधव जगताप यांनी काढले आहेत.

संपूर्ण यंत्रणा अडकून पडेल

सौरऊर्जा, गांडूळ खत प्रकल्प तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी योजनांसाठी असणारी कर सवलत चालू ठेवण्यासाठी नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. यामध्ये संपूर्ण यंत्रणा अडकून पडणार आहे. पुणेकर प्रामाणिकपणे कर भरत आहेत, आपले बिल पोहोचले नाही तरी देखील बिल काढून पैसे भरतात. क्षेत्रीय कार्यालयाची यंत्रणा यासाठी वापरणे योग्य नाही. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सवलत मिळत असलेल्या १०० मिळकतींची तपासणी केली तर आपल्याला यामध्ये वस्तुस्थितीचा अंदाज येऊ शकतो. त्यामुळे याबाबत घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे यांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTaxकरMuncipal Corporationनगर पालिकाcivic issueनागरी समस्या