शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

"खूप कंटाळा आलाय, आता हे सगळं नको वाटतंय"; ५ दिवसांपूर्वीच अजितदादांनी व्यक्त केली होती मनातील सल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 09:53 IST

मृत्यूच्या पाच दिवस आधी अजित पवार यांनी जुने सहकारी किरण गुजर यांच्याकडे भावना व्यक्त केल्या होत्या.

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाने महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही. मात्र, आता त्यांच्या शेवटच्या दिवसांतील मानसिक स्थितीबाबत त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांनी माध्यमांशी बोलताना अत्यंत धक्कादायक आणि भावूक माहिती दिली आहे. "आता हे सगळं नको वाटतंय, बास झालं," अशी भावना अजित पवारांनी मृत्यूच्या अवघ्या पाच दिवसांपूर्वी व्यक्त केली होती, असा खुलासा गुजर यांनी केला आहे.

"तेच शेवटचं जेवण ठरलं..."

किरण गुजर यांनी अजितदादांसोबतच्या शेवटच्या भेटीच्या भावूक आठवणींना उजाळा दिला. "पाच दिवसांपूर्वी दादांशी बोलणं झालं होतं. ते खूप थकलेले वाटत होते. मला म्हणाले की, किरण, खूप कंटाळा आलाय, आपण दोघे कुठे तरी बाहेर जाऊया. आम्ही अर्धा दिवस बाहेर फिरलो, एकत्र जेवलो. पण ते जेवण आमच्या आयुष्यातील शेवटचं जेवण ठरेल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. प्रवासात ते सतत म्हणत होते की, आता मला हे सगळं नकोसं वाटतंय. या सगळ्या गोष्टींचा (राजकारणाचा) मला खूप त्रास होतोय."

कामाची मरमर आणि टीकेची टोचणी

अलीकडच्या काही काळात अजित पवार राजकारणातील आरोप-प्रत्यारोपांमुळे व्यथित झाले होते. निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने आणि विरोधकांच्या टीकेमुळे त्यांच्या मनाला खोलवर जखम झाली होती. याबद्दल गुजर सांगतात, "अजितदादा अत्यंत हळव्या मनाचे होते. ते मला म्हणायचे की, मी लोकांसाठी एवढं मरमर काम करतोय, रात्रंदिवस झटतोय, तरीही माझ्या वाट्याला गालबोट का लागतंय? लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर तर ते विधानसभा लढायलाही तयार नव्हते, मीच त्यांचं मन वळवलं होतं. मी कुणाचं वाईट केलंय? मग लोक माझ्यावर आणि बारामतीमध्ये माझ्यावर टीका का करतात?' असा सवाल ते विचलित होऊन विचारायचे."

'करड्या' शिस्तीच्या माणसाचा बदललेला स्वभाव

अजित पवारांची ओळख नेहमीच एका शिस्तप्रिय आणि करड्या स्वभावाच्या नेत्याची राहिली. मात्र, वयोमानानुसार त्यांच्या स्वभावात मोठा बदल झाला होता, असे गुजर यांनी सांगितले. लहानपणी वडिलांचे छत्र हरवल्याने आणि कौटुंबिक परिस्थितीमुळे सुरुवातीला दादांचा देवावर विश्वास नव्हता. "देवाने माझं काय केलंय?" असं ते पूर्वी विचारायचे. मात्र, अनुभवाने ते बदलले. त्यांच्यात श्रद्धा होती, पण अंधश्रद्धा नव्हती, असेही किरण गुजर म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar Expressed Weariness Before Death: 'Don't Want This Anymore'

Web Summary : Days before his death, Ajit Pawar told a close associate he was weary and wanted to escape politics, feeling burdened by criticism despite his hard work. He was deeply affected by recent political events.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाBaramatiबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेस