शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
4
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
5
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
6
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
7
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
8
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
9
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
10
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
11
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
12
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
13
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
14
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
15
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
16
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
17
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
18
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
19
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!
20
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार

पुणे महापालिकेने कृत्रिम झाडांवर मंजूर केले ८८ लाख! ही तर खरं पैशांची उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 1:23 PM

कृत्रिम झाडे लावण्यासाठी मंजूर झालेले टेंडर रद्द करण्याची नागरिकांची मागणी

ठळक मुद्देअर्थव्यवस्था ढासळली असताना एवढा खर्च का - नागरिकांचा प्रश्न

पुणे महानगरपालिका कृत्रिम झाडांच्या दिखाऊ आणि बिनमहत्वाच्या कामांसाठी ८८ लाख खर्च करत आहे. हे करदात्यांच्या कराचे पैसे आहेत. त्यांनी टेंडर रद्द करून तातडीने पैशांची उधळपट्टी थांबवावी अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे.  कोरोनाच्या संकटात महापालिकेच्या अर्थसंकल्पात गृहीत धरलेल्या उत्पन्नाच्या ६० टक्के सुद्धा मिळणे कठीण आहे. पाणीपुरवठा, मलनिसारण, कचरा, विल्हेवाट, रस्ते, सार्वजनिक वाहतूक यासारख्या अत्यावश्यक विकासासाठी प्रधान्याने खर्च होणे अपेक्षित आहे. हे टेंडर पाहून आश्चर्य वाटत असल्याचे नागरिकांच्या पत्रात नमूद केले आहे. 

कोथरूडच्या डहाणूकर कॉलनीतील बाळासाहेब गार्डनमध्ये तब्बल ८८ लाख खर्च करून टॉकिंग ट्री प्रकल्पाअंतर्गत कृत्रिम वृक्ष लावण्यात येणार आहेत. त्यामुळे बागेचे आकर्षण वाढणार असल्याचे महापौरांनी सांगितले. पण एवढा खर्च करून टॉकिंग ट्री हा प्रकल्प राबवू नये. यासाठी नागरिक आणि निसर्गप्रेमी यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. 

बाळासाहेब गार्डनमध्ये मागच्या वर्षी संचारबंदी जाहीर होण्यापूर्वी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने डायनसोर पार्क तयार करण्याचे ठरवले होते. त्यासाठी १ कोटी ४४ लाखांचा निधी मंजूरही झाला होता. पण ते काम अद्यापही पूर्ण झाले नाही. त्याच ठिकाणी आता टॉकिंग ट्री हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्यासाठी ८८ लाख निधी मंजूर झाला आहे. यामुळे सर्व निसर्गप्रेमी आश्चर्यचकित झाले आहेत. 

शहरातील विकासकामांसाठी अनेक ठिकाणी वृक्षतोड केली जाते. त्याबद्दल कोणी आवाजही उठवत नाही. महापालिका वृक्षतोड करण्यात अग्रेसर आहे. पण वृक्षारोपण साठी एक पाऊल उचलले जात नाही. कोव्हिडं काळात सर्वांना झाडांची गरज होती. तेव्हा मात्र सगळीकडची हिरवळ गायब झाल्याचे चित्र दिसत होते. मागच्या वर्षी अर्थव्यवस्था ढासळली असताना एवढा खर्च का केला जात आहे. असा प्रश्नही नागरिकांनी विचारला आहे.कृत्रिम झाडे लावण्यापेक्षा आधीच्या झाडांची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरात वृक्षारोपण करावे. बागेच्या आकर्षणासाठी एवढा निधी खर्च करून कृत्रिम झाडे लावू नयेत.

नगरसेविका दीपाली धुमाळ यांचेही महापालिकेला पत्र   पुणे महापालिकेच्या उदयान विभागाकडून शहरात अनेक ठिकाणी व महापालिकेच्या उदयानांमध्ये वृक्ष लावले जातात. महापालिकेच्या पर्यावरण अहवालानुसार शहरास अजून पुर्णपणे ग्रीन कव्हर होण्याच्या उददेशाने मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करणे अपेक्षित आहे. मात्र पुणे महापालिकेकडून वृक्ष लागवड करणेऐवजी खोटी बोलकी झाडे लावली जात आहे. पुणे महानगरपालिकेकडून कोथरूड येथील उदयानांमध्ये ८८ लाख रूपये खर्च करून झाडे बसवण्याचा घाट घातला जात आहे. कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती खालावली असून शहरातील अनेक विकासकामे आपण थांबविली आहेत. उपनगरांमध्ये पाणी, ड्रेनेज, रस्ते, विदयुत व इतर पायाभूत सेवा सुविधा नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत असून हे नागरिक महापालिकेचा मिळकत कर पूर्णपणे भरतात. पुणेकरांनी मनपाच्या तिजोरीत मिळकत कराच्या माध्यमातून कोटयावधींचा भरणा कोरोना काळात उत्पन्न घटले असतानाही मनपावर विश्वास ठेवून केला आहे. त्याचा गैरकायदा सत्ताधारी पक्षाच्या दबावाने प्रशासनाकडून होत आहे. महापालिकेकडून खरी झाडे लावण्यापेक्षा खोटी बोलकी झाडे लावली जाणे ही कोरोना काळात दुर्देवी बाब आहे. वास्तविक पुणे महापालिकेकडून मनपा हददीत सर्वत्र पायाभूत सेवा व सुविधा, रूग्णालयाच्या सुविधा सुसज्ज झाल्यानंतर शहराचे सुशोभिकरण करणे अपेक्षित आहे. कोरोनाच्या रूग्णांना बेडस उपलब्ध नाहीत, व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत, विलगीकरण कक्षामध्ये सुविधा नाहीत अशी दयनीय अवस्था असताना प्रशासनाकडून ८८ लाखांच्या सुशोभिकरणाच्या निविदा प्रक्रिया राबविल्या जाणे हे महापालिकेस व पुणे शहराच्या संस्कृतीला अशोभनीय आहे. असे त्यांनी पात्रात नमूद केले आहे. ................................................................................................................................................................

 

टॅग्स :PuneपुणेkothrudकोथरूडMayorमहापौर