शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
2
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
3
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
4
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
6
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
7
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
8
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
9
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
10
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
12
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
13
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
14
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
15
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
16
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
17
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
18
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
19
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
20
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार

ते स्वराज्य आज कोणाच्या हाती आहे? अरविंद शिंदेंचा सवाल

By राजू इनामदार | Updated: March 11, 2025 16:23 IST

शंभूराजांचे नाव घेऊन आपले बस्तान मांडणारे, त्यांच्या बलिदानाचा अवमान करत आहेत असे ते म्हणाले.

पुणेछत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त काँग्रेसभवनमध्ये त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. शहराध्यक्ष अऱविंद शिंदे यांनी यावेळी आपल्या माती व माणसांसाठी जे अमर जाहले, ते स्वराज्य आज कोणाच्या हाती आहे? असा सवाल केला. शंभूराजांचे नाव घेऊन आपले बस्तान मांडणारे, त्यांच्या बलिदानाचा अवमान करत आहेत असे ते म्हणाले.पक्षाच्या कार्यालयात यावेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस शिंदे यांनी पुष्पहार अपर्ण केला व अभिवादन केले. ते म्हणाले, ‘‘औरंगजेबाने शंभूराजे यांच्यासमोर जिवाच्या बदल्यात स्वराज्याचा सौदा केला होता. पण स्वराज्याच्या मातीशी आणि माणसांशी बेईमानी करेल तो शिवाचा छावा शंभू कसा? स्वराज्याच्या रक्षणाखातर त्यांनी आपले प्राण अर्पिले.

आपल्या माती व माणसांसाठी जे अमर जाहले. ते स्वराज्य आज कोणाच्या हाती आहे? केवळ छत्रपतींचे नाव घेवून ते मुगलांविरुद्ध होते असे खोटं हिंदुत्व भासवून धार्मिक तेढ निर्माण करायची. दुसरीकडे त्यांची सतत बदनामी करायची आणि हिंदुत्वाच्या नावावर आपलं बस्तान मांडायचं. स्वराज्यासाठी आपला देह त्यागलेल्या शंभू राजेंचा हा अवमान आहे. गुलाम होऊन पारतंत्र्यात खितपत पडण्याआधी जागे झाले पाहिजे. छत्रपती शंभू राजे सर्वांना बळ देवो!’’.पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी बाळासाहेब अमराळे सुत्रसंचालन केले. प्राची दुधाणे, माया डुरे, अनुसूचित जमाती विभागाचे अध्यक्ष सुजित यादव, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, आबा जगताप, अनिल पवार, देवीदास लोणकर, सचिन सावंत, दिलीप लोळगे, भगवान कडू, सुंदर ओव्हाळ, अनिला धिमधिमे, प्रियंका मधाळे, अर्चना शहा, मंदा जाधव, ज्योती परदेशी, कविता भागवत, सचिन भोसले, संतोष हंगरगी, संदिप कांबळे, अभिषेक यादव व अन्य पदाधिकारी, कार्यकर्त उपस्थित होते.

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी