जमिनीच्या वादातून संपूर्ण कुटुंबाला केली मारहाण, पाच जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 06:26 PM2021-04-02T18:26:17+5:302021-04-02T18:33:12+5:30

जमिनीची मोजणी करताना घडली ही घटना

The whole family was beaten up over a land dispute, and five people were charged | जमिनीच्या वादातून संपूर्ण कुटुंबाला केली मारहाण, पाच जणांवर गुन्हा दाखल

जमिनीच्या वादातून संपूर्ण कुटुंबाला केली मारहाण, पाच जणांवर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देमारहाणीत कुटुंबातील सर्वच सदस्य गंभीर जखमी

बाभुळगाव: शेतजमीन मोजणीच्या वादातून चर्मकार कुटुंबाला त्याच गावातील पाच जणांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नितिन दगडु लोंढे.(वय ४०), रा.बाभुळगाव यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दहशत निर्माण करणार्‍या पाच पैकी तीन जणांवर अणुसुचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर दोन जणांवर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पांडुरंग भगवान देवकर, अजित पांडुरंग देवकर, नवनाथ पांडुरंग देवकर सर्व.बाभुळगाव अशी अणुसुचित जाती आणि जमाती( अत्याचार प्रतिबंधक) अट्राॅसिटी, व नागरी हक्क संरक्षण कायद्या अतर्गत गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.  सचिद्र्या वाफ्या पवार व अक्षय सचिद्र्या पवार यांच्यावर मारहाण कुटुंबातील सदस्यांना गंभीर जखमी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

बुधवारी ३१ मार्चला लोंढे यांच्या मालकीच्या २ एकर जमिनीची मोजणी चालू होती. शासकीय अधिकाऱ्यांनी जमिनीची मोजणी करून शेतीची हद्द व खुणा पूर्ण केल्या. त्यावेळी वरील आरोपी यांनी संगनमत करून मोजणीच्या ठीकाणी आले. लोंढे यांना दमदाटी करून डोक्यात दगड फेकून मारला. व लाथाबुक्यानी मारहाणही केली. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी मध्यस्थी करून मारहाण करू नका असे सांगितले. त्यावेळी आरोपींनी वडिलांच्या हातावर लोखंडी रॉड मारला. त्याठिकाणी आरोपींनी सोडु नका, यांना मारा असे म्हणत सर्वाना गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. बारामती पोलीस उपविभागीय अधिकारी पुढील तपास करत आहेत.  

Web Title: The whole family was beaten up over a land dispute, and five people were charged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.