शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

PDCC: कोण होणार जिल्हा बँकेचा अध्यक्ष? अशोक पवार की दिलीप मोहिते-पाटील; जिल्ह्यात जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 19:30 IST

गेल्या अनेक वर्षांपासून मंत्रीपदापासून वंचित असलेल्या खेड तालुक्यातील आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना किमान जिल्हा बँकेचे अध्यक्ष पद तरी द्या अशी जोरदार मागणी मोहिते-पाटील समर्थकांनी पक्षाचे नेते अजित पवार यांच्याकडे केली

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीनंतर होऊ घातलेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीसाठी शनिवारी (दि. १५) पहिली बैठक होत आहे. या दोन्ही पदांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाव निश्चित करणार आहेत. यामध्ये सर्वात आघाडीवर नाव असलेले शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी अध्यक्ष होण्यात आपल्याला स्वारस्य नसल्याचे सांगत मंत्रिपदासाठीचा क्लेम कायम ठेवला आहे. तर गेल्या अनेक वर्षांपासून मंत्रीपदापासून वंचित असलेल्या खेड तालुक्यातील आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना किमान जिल्हा बँकेचे अध्यक्ष पद तरी द्या अशी जोरदार मागणी मोहिते-पाटील समर्थकांनी पक्षाचे नेते अजित पवार यांच्याकडे केली आहे. 

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी प्रामुख्याने आमदार अशोक पवार यांचे नाव पुढे आले होते. मात्र, त्यांनी आपण अध्यक्षपदासाठी इच्छुक नसल्याचे सांगितल्याने आता बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा कोणाकडे सोपवणार, याची चर्चा सुरू झाली आहे. खेडचे आमदार दिलीप मोहिते, जुन्नरचे संचालक संजय काळे,  पुरंदर तालुक्यातील संचालक प्रा.दिगंबर दुर्गाडे, विकास दांगट यांच्यासह विद्यमान अध्यक्ष व सर्वात ज्येष्ठ संचालक रमेश थोरात यांची नावे चर्चेत आली आहेत. अजित पवार यांनी त्यांच्या पॅनलच्या सर्व संचालकांची बैठक शनिवारी सकाळी १० वाजता जिल्हा बँकेत बोलावली आहे. या बैठकीमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचे उमेदवार निश्चित केले जाणार असून, त्यानंतर दुपारी एक वाजता ही निवडणूक होणार आहे.

टॅग्स :KhedखेडAjit Pawarअजित पवारbankबँकElectionनिवडणूकMLAआमदार