शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

भारत माता सधवा का विधवा हे ठरवणारे तुम्ही कोण? रुपाली चाकणकरांचा भिडेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 18:11 IST

मुलीने टिकली लावली नाही म्हणून तिला नाकारणाऱ्या मनुवादी भूमिकेला मात्र माझा विरोध

पुणे : संभाजी भिडे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी एका महिला पत्रकार त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आल्या असता भिडेंनी महिलेला कुंकू लावण्याचा सल्ला दिला. तसेच  प्रत्येक स्त्री ही भारतमातेचं रुप आहे, अन् आमची भारतमाता विधवा नाही. तू आधी कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो, असे संभाजी भिडे त्यावेळी म्हणाले होते. त्यावरून संपूर्ण राज्यातून भिडेंवर टीका होऊ लागली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर आज आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुद्धा भिडे यांचा समाचार घेतला आहे. भारत माता सधवा का विधवा हे ठरवणारे तुम्ही कोण ?, असा सवाल चाकणकर यांनी भिडेंना विचारला आहे.

पुण्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने सोमवारी महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते यशवंत मनोहर यांना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. 

चाकणकर म्हणाल्या, संभाजी भिडे मुलींना टिकली लावण्याचा आग्रह धरतात. त्यांना मला सांगायचंय की, ज्या सावित्रीमाई आडवं कुंकू लावत होत्या डोक्यावरून पदर घेत होत्या. त्यांनाही तुम्ही त्रास दिला. या सनातनी मानसिकतेला आमचा विरोध आहे आणि इथून पुढेही राहील. जिजाऊ, लक्ष्मीबाई, अहिल्याबाई यांचं योगदान काहीच नाही का? भारत माता सधवा का विधवा हे ठरवणारे तुम्ही कोण? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. 

विधवांचा सन्मान करण्यासाठी आम्ही हळदीकुंकू सोहळा करतो. मुलीने टिकली लावली नाही म्हणून तिला नाकारणाऱ्या मनुवादी भूमिकेला मात्र माझा विरोध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

टॅग्स :PuneपुणेSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीWomenमहिलाSocialसामाजिकPoliticsराजकारणRupali Chakankarरुपाली चाकणकर