माझ्यावर टीका करणारे तुम्ही कोण?: विक्रम गोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 03:22 IST2017-08-04T03:22:38+5:302017-08-04T03:22:38+5:30

लोकशाहीने मला सैनिक, शेतकºयांवर होणाºया अन्यायाच्या विरोधात बोलण्याचा व सामाजिक, सांस्कृतिक मत व्यक्त करण्याचा अधिकार दिला आहे.

 Who are you criticizing me ?: Vikram Gokhale | माझ्यावर टीका करणारे तुम्ही कोण?: विक्रम गोखले

माझ्यावर टीका करणारे तुम्ही कोण?: विक्रम गोखले

पुणे : लोकशाहीने मला सैनिक, शेतकºयांवर होणाºया अन्यायाच्या विरोधात बोलण्याचा व सामाजिक, सांस्कृतिक मत व्यक्त करण्याचा अधिकार दिला आहे. सैनिक आणि देशाच्या सुरक्षेविरोधात बोलणाºयांना फाशी द्या, या विधानानंतर ‘तुम्ही कोण’ असे म्हणत माझ्यावर टीकास्त्र सोडण्यात आले. परंतु, माझ्यावर टीका करणारे तुम्ही कोण, असा परखड सवाल ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी उपस्थित केला.
क्रीडामहर्षी हरिभाऊ साने प्रतिष्ठानच्या वतीने अभिनेते विक्रम गोखले, सुव्रत जोशी, क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांना हरिभाऊ साने पुरस्काराने गौरवण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात आले. महापौर मुक्ता टिळक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. बाळासाहेब साने यांनी प्रास्ताविक, संजय गोखले यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title:  Who are you criticizing me ?: Vikram Gokhale