शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
4
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
5
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
6
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
7
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
8
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
9
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
10
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
11
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
12
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
13
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
14
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
15
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
16
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
17
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
18
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
19
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट

जिन्हे नाज है " हिंद " ; पर वो कहा है ? योगेंद्र यादव यांचा परखड सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 20:25 IST

ज्यांच्या जाहीरनाम्यात शिक्षण आणि रोजगार याला स्थान नाही अशा राज्यकर्त्यांकडून कसली अपेक्षा करणार?

ठळक मुद्देशिक्षण आणि बेरोजगारीचा प्रश्न निर्माण करणाऱ्या सरकारला धरले धारेवररोजगारीच्या संधी कशा उपलब्ध करुन देणार हा मुख्य प्रश्न सरकारसमोर

पुणे : सत्तेचे केंद्रीकरण करुन त्यामागील शक्ती कायम आपल्या पाठीमागे राहायला हवी असा अट्टाहास सत्ताधा-यांचा आहे. मात्र यासगळ्यात देशातील तरुणांच्या भविष्य अंधातरीत आहे याची पर्वा त्यांना नाही. ज्यांच्या जाहीरनाम्यात शिक्षण आणि रोजगार याला स्थान नाही अशा राज्यकर्त्यांकडून कसली अपेक्षा करणार? देशाच्या लोकशाही, सांस्कृतिक विभिन्नता आणि विकास या तीन स्तंभावर दबाव आणला.  विकासाची भाषा बोलणा-यांनी आतापर्यंत शिक्षण आणि रोजगार याविषयी सातत्याने खोटे सांगत आहे. त्यामुळे जिन्हे नाज है वो  हिंद कहा है ? असा प्रश्न स्वराज्य सेनेचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी सरकारला विचारत धारेवर धरले.  देश मेरा वोट मेरा मुद्दा मेरा या अभियनातर्गत सुराज्य सेनेच्या वतीने योगेंद्र यादव यांनी तरुणाईशी संवाद साधला. सामाजिक कार्यक र्ते सुभाष वारे, सुराज्य सेनेचे मार्गदर्शक राजन भिसे आणि समन्वयक अमोल कार्ले उपस्थित होते. यादव म्हणाले, अद्यापही आपल्याकडे युरोपीय देशांतील विद्यापीठांमध्ये सुरु असणा-या अभ्यासक्रमाची  कॉपी केली जाते. सुरुवातीला तो अभ्यासक्रम दिल्ली युनिव्हर्सिटी, जेएनयु त्यानंतर मुंबई मग पुणे विद्यापीठात शिकविला जातो. प्रवाहाबाहेर पडून काही वेगळा विचार करुन नवशिक्षणाची निर्मिती करण्याचे धाडसाचा आपल्याकडे अभाव आहे. त्यात शिक्षणामध्ये वाढत जाणारा हस्तक्षेप देखील धोकादायक आहे. मागील पाच वर्षात जॉब लॉस ग्रोथ झाली आहे. असे म्हणावे लागेल. रोजगार प्राप्तीकरिता समाजात नकारात्मकता वाढीस चालली आहे. एक कोटी युवक दरवर्षी नोकरीच्या शोधात देशभरात फिरताना दिसत आहे. मात्र ज्या देशात रोजगाराचा दर कमी होत आहे तिथे युवकांना रोजगारीच्या संधी कशा उपलब्ध करुन देणार हा मुख्य प्रश्न सरकारसमोर आहे

* न्यायाकरिता राष्ट्रव्यापी युवक आंदोलन छेडावे लागेलयुवकांनी स्वत:ला गुलामी हवी की हक्काची नोकरी हे ठरविण्याची वेळ आली आहे. विद्रोह करुन त्यांना आपल्या हक्कांकरिता भांडावे लागेल. सध्या सांस्कृतिक व वैचारिक संघर्ष सुरु असून त्याविरोधात  बँटिंग कुणीही केली तरी विकेट  घेण्याकरिता आरएसएस तयार आहे. त्यामुळे भविष्यात अस्तित्वाकरिता तरुणाईला संवाद वाढवावा लागेल. रोजगार निर्मितीकरिता दीर्घकालीन संरचनात्मक कृती कार्यक्रम हाती घ्यावा लागेल. त्यासाठी अथक संघर्ष, संरचनात्मक कार्य आणि ज्ञान यावर भर देणे गरजेचे असल्याचे यादव यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेYogendra Yadavयोगेंद्र यादवGovernmentसरकारEducationशिक्षणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९