शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील येरवडा कारागृहात माेबाइल येतात काेठून? कैद्यांच्या अंगझडतीत सापडले दाेन माेबाइल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 11:55 IST

गोपनीय माहितीच्या आधारे अंगझडती घेताना खिशात एक मोबाइल फोन बॅटरीसह आढळून आला

पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद्यांना मोबाइल वापरण्यास बंदी असतानाही कैद्यांकडून मोबाइलचा बेकायदा वापर सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला. या बाबत कैद्यांची अंगझडती घेतली असता दाेन माेबाइल सापडले. याप्रकरणी कारागृह प्रशासनाकडून चार कैद्यांविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राजू अस्वले, सचिन उर्फ पप्पू दत्तात्रय घोलप, आकाश उत्तम रणदिवे आणि तालीम आसमोहम्मद खान या चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी सॅमसंग कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाइल, बॅटरी, सिम कार्ड तसेच कचाडा कंपनीचा राखाडी रंगाचा एक मोबाइल जप्त करण्यात आला. येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे तुरुंगाधिकारी रेवनाथ कडू कानडे (५४) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात आराेपींविराेधात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार ते ६ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास येरवडा मध्यवर्ती कारागृहात तक्रारदार कानडे हे तुरुंगाधिकारी म्हणून काम करत होते. त्यावेळी न्यायालयीन बंदी तालीम आसमोहम्मद खान हा मोबाइल वापरत असल्याची गोपनीय माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे खानला बोलवून त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या खिशात एक राखाडी रंगाचा कचाडा कंपनीचा मोबाइल फोन बॅटरीसह आढळून आला. तसेच अन्य कैद्यांची तपासणी केली असता, टिळक सेपरेट खोली क्रमांक ३० मध्ये झडती घेतली असता, न्यायालयीन बंदी राजू तुकाराम अस्वले याच्या अंगझडतीत पँटच्या खिशात एक काळ्या रंगाचा मोबाइल फोन बॅटरीसह व एअरटेल कंपनीचे चिन्ह असलेले सिम कार्ड लपवून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आले.

चौकशीदरम्यान, कैदी राजू असवले, सचिन घोलप, आकाश रणदिवे यांनी आपापसात संगनमत करून येरवडा मध्यवर्ती कारागृहात कटकारस्थान करून सॅमसंग कंपनीचा मोबाइल फोन बॅटरीसह व सिम कार्डसह कारागृहाबाहेरून घेऊन जात त्याचा वापर करून कारागृह नियमाचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास येरवडा पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक सुरेखा गाताडे या करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेyerwada jailयेरवडा जेलPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMobileमोबाइल