कुठे रंग उधळले, तर कुठे उडाले...

By Admin | Updated: February 24, 2017 03:08 IST2017-02-24T03:08:00+5:302017-02-24T03:08:00+5:30

महापालिका निवडणुकीचे निकाल हाती येताच विजयी भाजपा उमेदवार भाजपा कार्यालयात पालकमंत्री गिरीश बापट

Where the color is blown, where the blows ... | कुठे रंग उधळले, तर कुठे उडाले...

कुठे रंग उधळले, तर कुठे उडाले...

पुणे : महापालिका निवडणुकीचे निकाल हाती येताच विजयी भाजपा उमेदवार भाजपा कार्यालयात पालकमंत्री गिरीश बापट व शहराध्यक्ष योगेश गोगावले यांना भेटायला येताना गुलाल उधळत आपला विजय साजरा करीत असताना, दुसरीकडे ज्यांची गेली १५ वर्षे महापालिकेत सत्ता होती अशा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचा रंग उडालेला होता.
महापालिकेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील काँग्रेसभवनच्या परिसरात निकालाच्या दिवशी दुपारच्या वेळेत शुकशुकाट पाहायला मिळाला. काँग्रेलभवन समोरील पटांगणात २-३ चारचाकी वाहने फक्त उभी होती. आतल्या बाजूस काही कार्यकर्ते वाहिण्यांवर निकाल पाहत होते. अनेक कार्यकर्ते भाजापाची पुण्यातील मुसंडी पाहून आवाक् झाले होते, तर काही कार्यकर्ते येणाऱ्या निकालांचे विश्लेषण करीत होते. वर्षानुवर्षे विजयाचा आनंद साजरा करणारी वास्तू आज मात्र शांत होती.

१ दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातही सारखीच परिस्थिती पाहायला मिळाली. राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नीने भाजपाकडून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला व कोर्टाच्या निर्णयामुळे अपक्ष म्हणून लढावी लागणारी निवडणूक या नाट्यमय घडामोडींमुळे राष्ट्रवादी कार्यालयातील फ्लेक्सवरील अनिल भोसले यांचा फोटो झाकून टाकण्यात आला होता.

२ कार्यालयाच्या बाहेर घातलेल्या मंडपात काही कार्यकर्ते वाहिन्यांवर निकाल काय लागतोय याच्याकडे डोळे लावू बसले होते. राष्ट्रवादीची कामगिरी समाधनकारक नसल्याने कार्यकर्त्यांचे चेहरे मावळले होते.
३ मागच्या महापालिका निवडणुकीत नंबर २ चा पक्ष असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भांडारकर रोडवरील कार्यालयात तर सन्नाटा पाहायला मिळाला. बाहेर लावलेला पक्षाचा झेंड्याचा फ्लेक्सही झाकून ठेवण्यात आलेला दिसून आला. त्यामुळे महापालिका निकालानंतर, ‘कही खुशी, कही गम’ अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळाली.

Web Title: Where the color is blown, where the blows ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.