शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांच्या अनुपस्थितीत पुण्याची धुरा गृहमंत्री तर बारामतीची जिल्हाधिकाऱ्यांच्या खांद्यावर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 18:44 IST

कोरोना आढावा बैठकीसह पोलिस, नगरपालिका आणि अन्य विकास कामांचा जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी घेतला आढावा...

पुणे :  गेल्या दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार नक्की कुठे आहेत, असाच प्रश्न पुणेकर आणि बारामतीकरांना पडला आहे. यामुळेच तर शुक्रवारची पुणे जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी तर शनिवारी बारामतीत कोरोना आढावा बैठक जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी घेतली.

अजित पवार यांचा दर आठवड्याच्या बैठकांचे नियोजन काही दिवस अगोदरच निश्चित होते. त्यानुसार शनिवार (दि.२६) रोजीच्या बारामती तालुक्यातील कोरोना आढावा बैठकीसह अन्य विविध बैठका व विकास कामांचा आढावा निश्चित झाला होता. परंतू, गेल्या काही दिवसातील राज्यातील विविध घडामोडीमुळेच पवार बैठकींना अनुपस्थित होते. पुण्याची बैठक वळसे-पाटील यांनी घेतली. पण बारामतीची बैठक कोण घेणार अशी चर्चा होती. 

पुण्याचे जिल्हाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विश्वासातील अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यात गेल्या काही महिन्यांत जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी ज्या पध्दतीने जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती हातळली, रेमडेसिविरचा विषय असो की ऑक्सिजन, हाॅस्पिटलचे ऑडिट अत्यंत यसस्वी पणे सांभाळले. याशिवाय मेट्रोच्या जागेचा विषय, चांदणी चौकातील भूसंपादन,  रिंगरोड, पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाला गती दिली आहे. यामुळेच अजित पवार यांचा विश्वास सार्थ केला आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारच्या बारामतीच्या कोरोना आढावा बैठकीसह पोलिसांच्या कामाचा आढावा, बारामती नगरपरिषदेच्या विकास कामांचा आढावा, पंचायत समितीच्या कामांचा आढावा, तालुक्यातील सार्वजनिक विकास कामांचा आढावा, महसूल विभागाचा आढावा, इतर विकास कामांचा आढावा घेतला. तर दुपारनंतर शंभर बेड्सचे माॅड्युलर हाॅस्पिटलच्या कामाची पाहणी, शासकीय मेडिकल काॅलेज, कऱ्हा नदी विकास प्रकल्प, कन्हेरी रोपवाटीका व शिवसृष्टी व शासकीय आयुर्वेद काॅलेज आदी विकास कामांची पाहणी देखील केली. डाॅ.राजेश देशमुख यांनी अजित पवार यांनी निश्चित केलेल्या सर्व आढावा बैठका व विकास कामांची देखील पाहणी पूर्ण केली.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारcollectorजिल्हाधिकारीcorona virusकोरोना वायरस बातम्या