शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

एमपीएससी परीक्षार्थींच्या मुलाखती कधी होणार? तब्बल ५,७९८ उत्तीर्ण उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 12:11 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे उपलब्ध असणाऱ्या मनुष्यबळाचा तुटवडा गेल्या अनेक वर्षांपासून राज्य शासनाने भरून काढला नाही. अध्यक्ष व एक सदस्य यावरच एमपीएससीचे कामकाज सुरू आहे. परिणामी अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेणे आयोगाला शक्य होत नाही.

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गेल्या काही वर्षांत घेण्यात आलेल्या विविध पदांच्या परीक्षांसाठी पात्र ठरलेल्या तब्बल ५ हजार ७९८ उमेदवारांच्या मुलाखती प्रलंबित आहेत. तर तब्बल १३०० उमेदवारांचा निकाल अद्याप घोषित केलेला नाही. कोरोना आणि मराठा आरक्षणाचे कारण पुढे करून राज्य सरकार आणखी किती दिवस या उमेदवारांना ताटकळत ठेवणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे उपलब्ध असणाऱ्या मनुष्यबळाचा तुटवडा गेल्या अनेक वर्षांपासून राज्य शासनाने भरून काढला नाही. अध्यक्ष व एक सदस्य यावरच एमपीएससीचे कामकाज सुरू आहे. परिणामी अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेणे आयोगाला शक्य होत नाही. त्यामुळे राज्य शासनाने आयोगाच्या सदस्य संख्येत वाढ करणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह अनेक विद्यार्थी संघटनांनी राज्य शासनाला याबाबत निवेदन दिले. परंतु, अद्याप यावर कुठलाही निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे एमपीएससीतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेनंतर केवळ मुलाखत न झाल्यामुळे  विद्यार्थी अधिकारी होण्यापासून दूर आहेत.

मनुष्यबळाचा तुटवडामहाराष्ट्र लोकसेवा आयोगातील सदस्य संख्या व मनुष्यबळ आणि इतर राज्यातील आयोगाची सदस्य संख्या व मनुष्यबळ यांची कुठेच तुलना होऊ शकत नाही. एमपीएससीला केरळसारख्या छोट्या तुटपुंज्या मनुष्यबळावर काम करावे लागत आहे. त्यामुळेच स्थापत्य अभियंता, वनसेवा आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मुलाखती अद्याप झालेल्या नाहीत.

रखडलेल्या मुलाखतीस्थापत्य अभियंता : ३६७१वनसेवा : ३२२पोलीस उपनिरीक्षक : २१२७पशुधन विकास अधिकारी : १३०० (निकाल घोषित झाला नाही)

संयम सुटतो आहेमी तहसीलदार पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालो. जून २०२० मध्येच निकाल लागला. त्यावेळी कोरोनाचे कारण सांगून नियुक्त्या लांबणीवर टाकण्यात आल्या. पुढे सरकारचा सूरच बदलला. आता संयम सुटतो आहे. अधिकाराचा वापर करून शासनाने नियुक्त्या द्याव्यात.- निरंजन कदम, नागापूर (उमरखेड, यवतमाळ) 

 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीPuneपुणे