शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर 'हा' नेता राष्ट्रवादीत कधी प्रवेश करणार? अजित पवार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 14:25 IST

सोलापूर येथील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख महेश कोठे शिवबंधन सोडून हातात घड्याळ बांधणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

पुणे : सोलापूर येथील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख महेश कोठे शिवबंधन सोडून हातात घड्याळ बांधणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्याचवेळी शिवसेनेतून कोठे यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. मात्र यावर राजकीय वर्तुळात याविषयी उलट सुलट प्रतिक्रिया उमटत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मोठे भाष्य केले आहे. 

विधानसभा निवडणुकीत महेश कोठे यांनी शिवसेना उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केली होती. त्यावेळीही कोठे यांची सेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर कोठे पुन्हा सेनेत सक्रिय झाले होते. यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा त्यांची हकालपट्टी केल्याचे जाहीर केले.

पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटमध्ये आयोजित सभेला अजित पवार हे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, महेश कोठे आहे मागील सात-आठ महिन्यांपासून अस्वस्थ होते. वेगळी भूमिका घेण्याची त्यांची इच्छा होती. परंतु महाविकास आघाडीमध्ये एकमेकांचे कार्यकर्ते फोडायचे नाहीत असं ठरलेलं आहे. तसेच महेश कोठे हे मला भेटलेले नाहीत. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच मी याबाबत काही सांगू शकेन. 

कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टीमहेश कोठे यांनी गुरुवारी शिवसेना सोडल्याचे जाहीर केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी ते आणि त्यांचे समर्थक गुरुवारी रात्रीच मुंबईत पोहचले आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महेश कोठे यांचा राष्ट्रवादी प्रवेश होईल, असे कोठे समर्थकांकडून सांगण्यात आले होते. मात्र प्रवेशाचा कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला आहे. या राजकारणाचे पडसाद उमटले आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर केले.

 

टॅग्स :PuneपुणेShiv SenaशिवसेनाAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण